सात वर्षांच्या मुलीवर बापाकडून अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 18:42 IST2020-01-11T18:41:05+5:302020-01-11T18:42:15+5:30

चाळीस वर्षांच्या नराधम बापाने पोटच्या सात वर्षांच्या मुलीवर पाशवी अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार कोल्हापूर शहराला लागून असणाऱ्या उपनगरात शुक्रवारी रात्री घडला. मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर नागरिकांनी मारहाण करीत नराधमाला लक्ष्मीपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Seven-year-old girl abused by father | सात वर्षांच्या मुलीवर बापाकडून अत्याचार

सात वर्षांच्या मुलीवर बापाकडून अत्याचार

ठळक मुद्देसात वर्षांच्या मुलीवर बापाकडून अत्याचारउपनगरातील घटना, मारहाण करीत पोलिसांच्या ताब्यात

कोल्हापूर : चाळीस वर्षांच्या नराधम बापाने पोटच्या सात वर्षांच्या मुलीवर पाशवी अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार कोल्हापूर शहराला लागून असणाऱ्या उपनगरात शुक्रवारी रात्री घडला. मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर नागरिकांनी मारहाण करीत नराधमाला लक्ष्मीपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पीडित मुलीचा बाप शहरात हमालीचे काम करतो. तो दारूच्या आहारी गेला आहे. रोज घरी दारू पिऊन येत असतो. शुक्रवारी रात्री मद्यधुंद अवस्थेत घरी आला. मध्यरात्री झोपेत असलेल्या आपल्या सात वर्षांच्या मुलीचे तोंड दाबून अत्याचार केला. मुलीच्या ओरडण्याने आई जागी झाली. भेदरलेल्या मुलीची अवस्था पाहून ती घाबरली. तिला शांत करून पतीला बेदम मारहाण केली. आरडाओरडा करून गल्लीतील लोकांना जागे केले.

या प्रकाराची स्थानिक लोकांना माहिती दिल्यानंतर संतप्त नागरिकांनी त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर पोलीस ठाण्यात वर्दी दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संशयितास अटक केली. पीडित मुलीच्या आईने याबाबत तक्रार दिली. शहर पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी पोलीस ठाण्यात भेट देऊन घटनेची माहिती घेतली.

पीडित मुलीची सीपीआरमध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यामध्ये अत्याचार झाल्याचे निदान पुढे आले आहे. पीडित मुलगी घाबरली असून, तिला तिची आई सावरण्याचा प्रयत्न करीत आहे. बापचं नरभक्षक निघाल्याने नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे.

आईचे धाडस

नराधम पित्यास दोन मुली व एक लहान मुलगा आहे. घरची परिस्थिती खूपच हलाकीची आहे. मोलमजुरी केल्याशिवाय घरात चूल पेटत नाही. अशा कुटुंबात राहणाऱ्या पोटच्या मुलीवर अत्याचार झाल्याचे लक्षात आल्यावर तिच्या आईने पतीला पाठीशी न घालता धाडसाने पोलिसांत तक्रार दिली. त्यामुळे नराधमास पोलीस कोठडीची हवा खावी लागली.

 

Web Title: Seven-year-old girl abused by father