सोहाळेत मधमाशांच्या हल्ल्यात एकाच कुटुंबातील सात जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2022 18:57 IST2022-10-30T18:57:36+5:302022-10-30T18:57:48+5:30
आजरा : सोहाळे ( ता.आजरा ) येथे मधमाशांच्या हल्ल्यात एकाच कुटुंबातील सात जण गंभीर जखमी झाले. सर्वजण भात कापण्यासाठी ...

सोहाळेत मधमाशांच्या हल्ल्यात एकाच कुटुंबातील सात जण जखमी
आजरा : सोहाळे ( ता.आजरा ) येथे मधमाशांच्या हल्ल्यात एकाच कुटुंबातील सात जण गंभीर जखमी झाले. सर्वजण भात कापण्यासाठी गेले असता दुपारी १२ वा. सुमारास घटना घडली.
आज सकाळी ९ वा. " हेळेम्हारकी " नावाच्या शेतात यल्लाप्पा कांबळे यासह त्यांचे कुटुंबीय भात कापण्यासाठी गेले होते. दुपारी १२ वा.च्या सुमारास शेतातील पक्षांकडून मधमाशांच्या पोळ्याला अचानक धक्का लागला. यावेळी मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात यल्लाप्पा बापू कांबळे ( वय ४० ) महादेवी यल्लाप्पा कांबळे ( वय ३५ ) उषाबाई संजय कांबळे ( वय ३८ ) संजय यल्लाप्पा कांबळे ( वय ५० ) विमल हिंदुराव कांबळे ( वय ४५ ) संजय काळू कांबळे ( वय ४५ ) व प्रज्वल यल्लाप्पा कांबळे ( वय १२ ) हे जखमी झाले आहेत.
मधमाशांकडून सुटका करून घेण्यासाठी झाडाचा पाला व अंगावरील टाॅवेलचा वापर करून सर्वांनी सुटका करून घेतली. सर्व जखमींना तातडीने ग्रामीण रुग्णालय आजरा येथे दाखल करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयात दिवसभर उपचार केल्यानंतर सायंकाळी सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. मेंढोलीपाठोपाठ सोहाळे येथे मधमाशांचा हल्ला झाल्यामुळे शेतकरी वर्गात भितीयुक्त वातावरण पसरले आहे.