‘करुणालय’मधील सात मुलांना कोरोनाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:22 IST2021-05-24T04:22:31+5:302021-05-24T04:22:31+5:30

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील शिये येथील ‘करुणालय’ संस्थेतील सात एड्स बाधित मुलांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांना शिवाजी विद्यापीठातील ...

Seven children in Karunalaya contracted corona | ‘करुणालय’मधील सात मुलांना कोरोनाची लागण

‘करुणालय’मधील सात मुलांना कोरोनाची लागण

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील शिये येथील ‘करुणालय’ संस्थेतील सात एड्स बाधित मुलांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांना शिवाजी विद्यापीठातील डीओटी कोविड केअर सेंटरमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. सर्व मुले सहव्याधीग्रस्त असल्यामुळे त्यांच्यावर विशेष उपचार केले जात असल्याचे या सेंटरचे प्रमुख डॉ. प्रकाश पावरा यांनी सांगितले.

कोरोना विषाणूंनी सर्वसामान्य जनतेबरोबरच आता बंदिस्त असलेल्या मुलांनाही टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी बालकल्याण संकुलातील ५१ मुले, अवनीच्या पुईखडी येथील निवासी शाळेतील १५ मुलींना कोरोनाची लागण झाली होती. ही मुले-मुली कोरोनामुक्त होऊन बाहेर पडतात तोच आता करवीर तालुक्यातील शिये येथील करुणालय संस्थेतील सात एड्सबाधित मुलांना कोरोनाने गाठले आहे.

दहा ते १७ वर्षे वयोगटातील ही मुले असून शुक्रवारी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे कळताच सर्वांना तत्काळ महानगरपालिकेमार्फत चालविल्या जाणाऱ्या शिवाजी विद्यापीठातील डीओटी कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. सहव्याधीग्रस्त असल्यामुळे सर्वच मुलांना नेहमीच्या औषधाेपचारासोबतच विशेष काळजी म्हणून टॉनिक, मल्टीव्हीटॅमिन सी व डी ही औषधेही दिली जात आहेत. त्यांची ऑक्सिजन पातळी, टेंम्प्रेचर दिवसातून दोन वेळा तपासले जात आहे. त्यांची प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Seven children in Karunalaya contracted corona