संच मान्यता जुन्या निकषाप्रमाणे व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:28 IST2021-09-22T04:28:01+5:302021-09-22T04:28:01+5:30

यावर्षी नवीन संच मान्यता ही आरटीई ॲक्ट २००९ नुसार होणार आहे. राज्य सरकारने दिलेली सवलत असणार नाही. त्यामुळे अनेक ...

Set recognition should follow the old criteria | संच मान्यता जुन्या निकषाप्रमाणे व्हावी

संच मान्यता जुन्या निकषाप्रमाणे व्हावी

यावर्षी नवीन संच मान्यता ही आरटीई ॲक्ट २००९ नुसार होणार आहे. राज्य सरकारने दिलेली सवलत असणार नाही. त्यामुळे अनेक चांगल्या शाळा मोठ्या शाळा या शिक्षकांअभावी मोडकळीस येणार आहेत. अनेक मुख्याध्यापक अपात्र होणार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांवर एकीकडे चांगले काम करून आणि पट वाढवूनही अतिरिक्त होण्याची नामुष्की ओढावणार आहे. त्यामुळे जुन्या निकषाप्रमाणे संचमान्यता व्हावी. आधार सक्तीमुळे अनेक शाळांची संच मान्यता अडचणीत येणार आहे. त्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी करण्यात आली. या शिष्टमंडळामध्ये संघाचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष रवीकुमार पाटील, महिला अध्यक्ष लक्ष्मी पाटील, सरचिटणीस सुनील पाटील, बाळासाहेब निंबाळकर, सुनील एडके, रोहिणी लोकरे, शुभांगी सुतार,सविता पाटील, संगीता खिल्लारे , जी .जी. पाटील यांचा समावेश होता.

यापूर्वीची संचमान्यता

यापूर्वी गेल्यावर्षी आणि त्यापूर्वी झालेल्या संचमान्यतेमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीसाठी ६१ च्या पुढे कितीही पट असला, तरी ३० पटास एक शिक्षक अशी मान्यता होती. इयत्ता पहिली ते पाचवीसाठी मुख्याध्यापक १५१ पटसंख्या निकष असला, तरी पात्र शाळेसाठी दहा टक्के सवलत देण्यात येत होती.

Web Title: Set recognition should follow the old criteria