शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

कोल्हापुरात ‘सीपीआर’मधील ५ कोटींच्या बोगस खरेदीवर वरिष्ठांचे पांघरुण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 12:44 IST

मुंबईत बैठका घेऊन ठेकेदारांना अभय, मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेविरोधात कारभार

समीर देशपांडेकोल्हापूर : बोगस दर कराराचा आधार घेऊन तब्बल ४ कोटी ८७ लाखांची ‘सीपीआर’मध्ये खरेदी केल्याचे स्पष्ट झाले. चौकशीही झाली. समितीने या गैरव्यवहारावर शिक्कामोर्तबही केले; परंतु संबंधित ठेकेदाराने अशी काही जादू केली आहे की, त्याच्यावर गुन्हासुद्धा दाखल झालेला नाही. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी कारवाईचे आश्वासन देऊन दोन महिने उलटून गेले; परंतु यामध्ये पुढे काहीच झाले नाही.

कोल्हापुरात घोटाळा करायचा आणि मुंबईत बैठका घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना सोबतच घेऊन मिटवामिटवी करायची असा फंडा सुरू आहे. एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घोटाळ्याचे निर्णय रद्द करत आहेत; मात्र कोल्हापुरातील अनेक प्रकरणांत कारवाईच होत नसल्याचे चित्र आहे.येथील व्ही. एस. एंटरप्रायजेसने मुलुंडच्या रुग्णालयाचे बोगस दरकरारपत्रक सादर करून या साहित्याची खरेदी केली होती. यासाठी जिल्हा नियोजन समितीमधील निधी वापरण्यात आला होता. हे सर्व प्रकरण १८, १९ आणि २० जुलै २०२४ रोजी ‘लोकमत’ने उघडकीस आणले. ‘सीपीआर’साठी लागणाऱ्या सर्जिकल साहित्यासह औषधांचा हा एकूण १२ कोटी १९ लाख रुपयांचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठवण्यात आला होता.

त्याला मान्यता मिळाल्यानंतर, जिल्हा नियोजन समितीकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आणि साहित्य पुरवठाही झाला; परंतु याचदरम्यान ठेका मिळवण्यासाठी जे दरकरारपत्र वापरण्यात आले होते ते बोगस असल्याचे पुढे आले. हे आमच्या रुग्णालयाचे दरकरारपत्र नव्हे. संबंधित तारखेला असे कोणतेही पत्र दिले नसल्याचे मुलुंडच्या रुग्णालयाने लेखी स्पष्ट केले होते.हे प्रकरण उघडकीस आल्यावर मंत्री मुश्रीफ यांनी तातडीने वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांची चौकशी समिती नेमली. डॉ. म्हैसेकर यांनी गैरव्यवहार झाल्याचा लेखी अहवाल दिला आणि उच्चस्तरीय चौकशीची शिफारसही केली. हा अहवाल गेल्यावर्षी १२ ऑगस्टच्या दरम्यान दिला असताना त्याच्याही पुढे काहीही झालेले नाही.

‘ऑर्थो’च्या उपकरणांमध्येही दाबादाबीगेल्या सप्टेंबरमध्ये ‘ऑर्थो’च्या उपकरणांच्या खरेदीची ३ कोटी रुपयांची निविदा काढली सी आर्मची गरज नसताना खरेदी करण्यात आल्याची चर्चा असून १६ लाख रुपयांचे हे एक उपकरण तब्बल ४९ लाख रुपयांना खरेदी करण्यात आल्याचे सांगण्यात येते. याप्रकरणी न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून, त्यातूनही ठेकेदाराचे पैसे अदा करण्यासाठी अधिकाऱ्यांची धावपळ सुरू असल्याचे समजते.

विरोधी पक्षांचेही दुर्लक्षकोल्हापुरात अशा गैरकारभाराविरोधात वास्तविक विरोधी पक्ष तुटून पडतात; परंतु संबंधित ठेकेदार भारी पडला असून, सर्वपक्षीयांनी या प्रश्नाकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसून येत आहे. महाविकास आघाडी अशा प्रकरणांमध्ये बोटचेपी भूमिका घेते का, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयHasan Mushrifहसन मुश्रीफChief Ministerमुख्यमंत्री