शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

एन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 01:06 IST

Senior leader N D Patil : काही दिवसांपूर्वी प्रा. पाटील यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह (Covid 19) आल्यानंतर त्यांनी त्यावर उपचार घेतले.

ठळक मुद्देअचानक रात्री बाराच्या सुमारास त्यांच्या प्रकृतीबद्धलची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यानंतर लगेच एका वृत्तवाहिनीने ब्रेकिंग न्यूजही दिली.

कोल्हापूर : जेष्ठ लढाऊ नेते प्रा एन. डी. पाटील यांची प्रकृती उत्तम असून ते दूध पिऊन झोपले असल्याची माहिती त्यांच्या पत्नी सरोज उर्फ माई पाटील यांनी सोमवारी मध्यरात्री 12.30 वाजता 'लोकमत'ला दिली. प्रा. पाटील हे कोरोनाला हरवून रविवारी रुग्णालयातून घरी आले आहेत. त्यांच्या लग्नाचा सोमवारी हिरकमहोत्सवी वाढदिवस होता. रात्री आठ वाजता नेहमीच्या सवयीप्रमाणे त्यांनी दूध घेतले आणि झोपी गेले.  (Senior leader N D Patil defeated corona at the age of 92 year, but...)

अचानक रात्री बाराच्या सुमारास त्यांच्या प्रकृतीबद्धलची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यानंतर लगेच एका वृत्तवाहिनीने ब्रेकिंग न्यूजही दिली. जी पोस्ट व्हायरल झाली, तिचा आधार घेऊन ही ब्रेकिंग न्यूज देण्यात आली. त्याबद्धल सरोज पाटील यांच्याकडे चौकशी केली असता त्यांना ही बातमी ऐकून जबर धक्का बसला. ही अत्यंत चुकीची बातमी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तोपर्यंत संबंधित वृत्तवाहिनीने एन डी सर कोरोनाला हरवून घरी आल्याचे वृत्त दिले आणि या खोट्या बातमीवर पडदा पडला. पण या घटनेमुळे पाटील कुटुंबीयांना प्रचंड मनस्ताप झाला.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी प्रा. पाटील यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह (Covid 19) आल्यानंतर त्यांनी त्यावर उपचार घेतले. त्यानंतर कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना रविवारी डिस्चार्ज मिळाला. सध्या त्यांची प्रकृती चांगली असून त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे जाणवत नाही आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkolhapurकोल्हापूरcorona virusकोरोना वायरस बातम्या