वारणेतील अथर्वच्या सॉफ्टवेअरची आंतरराष्ट्रीय स्पर्धेत निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 03:03 PM2020-07-24T15:03:15+5:302020-07-24T15:04:17+5:30

अ‍ॅपल आयोजित डब्ल्यूडब्ल्यूसीसी २0२0 मधील स्विफ्ट स्टुडंट्स चॅलेंज अवॉर्ड या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये अथर्व रमेश साळोखे याच्या सॉफ्टवेअर अ‍ॅप्लिकेशनची निवड झाली आहे. जगभरातील ४१ देशांमधील ३५ विद्यार्थ्यांमध्ये त्याचा समावेश आहे.

Selection of Atharva's software in international competition in Warne | वारणेतील अथर्वच्या सॉफ्टवेअरची आंतरराष्ट्रीय स्पर्धेत निवड

वारणेतील अथर्वच्या सॉफ्टवेअरची आंतरराष्ट्रीय स्पर्धेत निवड

Next
ठळक मुद्देवारणेतील अथर्वच्या सॉफ्टवेअरची आंतरराष्ट्रीय स्पर्धेत निवडस्विफ्ट स्टुडंट्स चॅलेंज अवॉर्ड : ४१ देशांतील ३५0 विद्यार्थ्यांमध्ये समावेश

कोल्हापूर : अ‍ॅपल आयोजित डब्ल्यूडब्ल्यूसीसी २0२0 मधील स्विफ्ट स्टुडंट्स चॅलेंज अवॉर्ड या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये अथर्व रमेश साळोखे याच्या सॉफ्टवेअर अ‍ॅप्लिकेशनची निवड झाली आहे. जगभरातील ४१ देशांमधील ३५ विद्यार्थ्यांमध्ये त्याचा समावेश आहे.

वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे इंग्लिश अकॅडमी येथे शिकणाऱ्या अथर्वने या स्पर्धेसाठी क्वांटोम सर्किट सिम्युलेटर या विषयावर प्रकल्प सादर केला होता. जगातील अग्रगण्य कॉम्प्युटर, स्मार्टफोन, स्मार्टवॉच उत्पादक कंपनी असणाऱ्या अ‍ॅपलने आपल्या उत्पादनामध्ये समाविष्ट नवीन तंत्रज्ञान व सॉफ्टवेअर सुविधांची सर्वांना माहिती व्हावी, यासाठी वर्ल्ड वाईड डेव्हलपर कॉन्फरन्सचे आयोजन केले होते.

मुलांमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटची आवड निर्माण व्हावी यासाठी जागतिक पातळीवरील कॉन्फरन्समध्ये स्विफ्ट स्टुडंट चॅलेंज अवॉर्ड ही स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये नाविन्यपूर्ण कल्पना, निर्मिती क्षमतेवर आधारित स्विफ्ट लँग्वेज सॉफ्टवेअर अ‍ॅप्लिकेशन किंवा गेम डेव्हलपमेंट करणे अपेक्षित असते.

अथर्वच्या यशासाठी वारणा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे, प्रशासकीय अधिकारी वासंती रासम, प्राचार्य मोनीस, डोईजड आणि शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. 

अथर्वला मिळणार या सुविधा

दरवर्षी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कॅलिफोर्निया येथील डब्ल्यूडब्ल्यूडीसी परिषदेसाठी आमंत्रित करण्यात येते. जगभरातील उपस्थित तज्ञांची ते यावेळी संवाद साधू शकतात. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना अ‍ॅपल डेव्हलपर प्रोग्रॅमची एक वर्षाची सदस्यता, प्रदर्शित करण्यापूर्वी सॉफ्टवेअर वापरण्यास परवानगी या सुविधा मिळतात. यावर्षी कोरोना विषाणूच्या प्रकोपामुळे ही परिषद आॅनलाईन होणार आहे.
 

Web Title: Selection of Atharva's software in international competition in Warne

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.