ताडोबातील दुसरी वाघीणही सह्याद्रीच्या कुशीत! 'टी ७- एस २' मादीचे चांदोली राष्ट्रीय उद्यानातील सोनारलीमध्ये 'सॉफ्ट रिलीज'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 10:56 IST2025-12-10T10:54:16+5:302025-12-10T10:56:50+5:30

'ऑपरेशन तारा': पांढरपौनी परिसरात 'टी ७- एस २' ही वाघीण ८ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी सुरक्षितपणे पकडली होती.

Second tigress from Tadoba in the Sahyadris! 'T7-S2' female 'soft released' in Sonarli in Chandoli National Park | ताडोबातील दुसरी वाघीणही सह्याद्रीच्या कुशीत! 'टी ७- एस २' मादीचे चांदोली राष्ट्रीय उद्यानातील सोनारलीमध्ये 'सॉफ्ट रिलीज'

ताडोबातील दुसरी वाघीणही सह्याद्रीच्या कुशीत! 'टी ७- एस २' मादीचे चांदोली राष्ट्रीय उद्यानातील सोनारलीमध्ये 'सॉफ्ट रिलीज'

कोल्हापूर : ‘ऑपरेशन तारा’ या सह्याद्री वाघ पुनर्स्थापन कार्यक्रमाच्या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत महाराष्ट्र वन विभागाने मंगळवारी सायंकाळी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून स्थलांतरित केलेल्या दोन वर्षांच्या   'टी ७- एस २' या वाघिणीला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली राष्ट्रीय उद्यानातील सोनारली अनुकूलन कुंपणात सोडण्यात आली. 

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोलारा कोअर रेंज, पांढरपौनी परिसरातून ही वाघीण ८ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी सुरक्षितपणे पकडली होती. त्यांनंतर तिची सखोल वैद्यकीय तपासणी करण्यात आली. 

केलेल्या तपासणीत ही वाघीण पूर्णतः तंदुरुस्त, निरोगी आणि स्थलांतरास योग्य असल्याचे निदर्शनास आले. वाघिणीची सुरक्षित पकड, वाहतूक आणि सॉफ्ट रिलिजची संपूर्ण प्रक्रिया ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या रॅपिड रेस्क्यू टीम व कोलारा कोअर रेंजमधील क्षेत्रीय वन कर्मचारी यांच्या उत्कृष्ट समन्वयामुळे यशस्वीपणे पार पडली.

भारतीय वन्यजीव संस्थेच्या वैज्ञानिक मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण या कार्यक्रमावर लक्ष ठेवून आहेत. याची अंमलबजावणी मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) डॉ. जितेंद्र रामगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली केली जात आहे.

वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. के. रमेश, तसेच फील्ड बायोलॉजिस्ट आकाश पाटील वाघीणीच्या अनुकूलन प्रक्रियेचे व वर्तणुकीचे शास्त्रीय निरीक्षण करीत आहेत.  प्रोजेक्ट टायगरचे सहाय्यक निरीक्षक डॉ. नंदकिशोर काळे आणि मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांचे यावर विशेष लक्ष आहे. 

सॉफ्ट रिलिज कशासाठी?

सॉफ्ट रिलिज पद्धतीमुळे वाघीण सुरक्षित कुंपणात राहून तेथील भूभाग, भक्ष्य प्रजाती व स्थानिक पर्यावरणाशी हळूहळू जुळवून घेते. यामुळे खुल्या जंगलात सोडण्यापूर्वी तिचे सुरक्षित पुनर्स्थापन, नैसर्गिक हालचाल व क्षेत्रीय स्थैर्य अधिक प्रभावीपणे साध्य होते, अशी माहिती पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) आणि ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे रॅपिड रेस्क्यू टीमचे प्रमुख डॉ. रविकांत खोब्रागडे यांनी दिली.

ही दुसरी 'टी ७- एस २' वाघीण पूर्णतः निरोगी असून, चांदोली परिसरात तिला आवश्यक असा सुरक्षित अधिवास आणि पुरेशा प्रमाणात भक्ष्यसाठा उपलब्ध आहे. -तुषार चव्हाण, क्षेत्र संचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प

'ऑपरेशन तारा’ अंतर्गत ताडोबा व सह्याद्री या व्याघ्र प्रकल्पांमधील उत्कृष्ट समन्वयामुळे राज्यातील वाघ संवर्धन चळवळ अधिक भक्कम होत आहे.  -एम. श्रीनिवास रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) 

'टी ७- एस २' वाघीण ही कोलारा कोअर रेंज, पांढरपौनी परिसरातील तरुण, सशक्त व नैसर्गिकरीत्या भ्रमणशील मादी आहे. तिचे आरोग्य उत्कृष्ट असून, स्थलांतरासाठी ती सर्वार्थाने योग्य आहे. ‘ऑपरेशन तारा’ अंतर्गत स्थलांतरित होणारी ही दुसरी मादी असून, तिची उपस्थिती सह्याद्री परिसरातील वाघ संवर्धनास अधिक बळकटी देईल. -डॉ. प्रभुनाथ शुक्ला, क्षेत्र संचालक, ताडोबा–अंधारी व्याघ्र प्रकल्प

Web Title : ताडोबा की दूसरी बाघिन सह्याद्री में पुनर्स्थापित, संरक्षण प्रयास जारी

Web Summary : 'ऑपरेशन तारा' के तहत ताडोबा की दो वर्षीय बाघिन टी7-एस2 को सफलतापूर्वक चंदोली राष्ट्रीय उद्यान में स्थानांतरित किया गया। स्वस्थ बाघिन को धीरे-धीरे नए वातावरण के अनुकूल बनाया जाएगा, जिससे सह्याद्री क्षेत्र में बाघ संरक्षण को बढ़ावा मिलेगा।

Web Title : Second Tadoba Tigress Relocated to Sahyadri for Conservation Efforts

Web Summary : A two-year-old tigress, T7-S2, from Tadoba was successfully relocated to Chandoli National Park as part of 'Operation Tara'. The healthy tigress will undergo a soft release, acclimatizing to the new environment to bolster tiger conservation in the Sahyadri region.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.