कोल्हापूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी कागल वगळता अन्य तालुक्यातील चित्र अजूनही नेमकेपणाने स्पष्ट झालेले नाही. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील घटक पक्षांमध्ये अजूनही चर्चेच्या फेऱ्या सुरू असून जागा वाटपाचा पेच अर्ज माघारीपर्यंत सुरू राहणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. दरम्यान, सोमवारपर्यंत जिल्हा परिषदेसाठी जिल्ह्यातून ४१ तर पंचायत समितीसाठी ४२ अर्ज दाखल झाले आहेत.महायुतीमध्येच सात तालुक्यात सध्या बिघाडी होईल अशी स्थिती असून करवीर, भुदरगड, राधानगरी आणि शिरोळबाबतही अजून निर्णय झालेला नाही. हातकणंगलेमध्ये महायुतीविरोधात महाविकास आघाडी असा सामना रंगणार असून विविध नेतेमंडळींच्या ठिकठिकाणी बैठका सुरू आहेत. कोल्हापूरमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक महायुतीमधील घटक पक्षांशी चर्चा करत असून काही ठिकाणी जनसुराज्य विरोधात भाजप असेही चित्र निर्माण झाले आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी ८३ उमेदवारी अर्ज दाखल, आजअखेर किती अर्ज वितरित झाले..वाचादुसरीकडे आमदार सतेज पाटील यांनी तालुकानिहाय महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी चर्चा सुरू ठेवली असून महायुतीमधील फाटाफुटीवर ते लक्ष ठेवून आहेत. शिरोळमध्ये शाहू आघाडीच्या चिन्हावर लढायचे की भाजपच्या यावर खल सुरू असून काही छोटे पक्ष आणि संघटना एक, दोन जिल्हा परिषद मतदारसंघापुरते उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवण्याची शक्यता दिसून येत आहे.
लढती बहुरंगी होण्याची चिन्हेजिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी इच्छुकांची संख्या पाहता अनेक ठिकाणी बहुरंगी आणि चित्रविचित्र लढती होण्याची शक्यता दिसून येत आहे. त्यामुळे नेते मंडळींनी बैठकांचा सपाटा लावला असला तरी जागा वाटपावरून स्वतच्या कार्यकर्त्यांचे आणि मित्रपक्षांचेही समाधान करता येईल अशी स्थिती निर्माण झाली आहे.
Web Summary : Kolhapur Zilla Parishad elections face disarray within alliances. Seat sharing remains unresolved. Multi-cornered contests are likely as major coalitions struggle to accommodate all aspirants, leading to potential conflicts and diverse electoral battles across constituencies.
Web Summary : कोल्हापुर जिला परिषद चुनाव में गठबंधन में मतभेद। सीटों का बँटवारा अनसुलझा। कई कोनों वाले मुकाबले की संभावना है क्योंकि प्रमुख गठबंधन सभी उम्मीदवारों को समायोजित करने के लिए संघर्ष कर रहे हैं, जिससे संभावित संघर्ष और विभिन्न निर्वाचन क्षेत्रों में विविध चुनावी लड़ाई हो सकती है।