शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
2
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
3
जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं एकदम खास 'गिफ्ट'
4
सोन्या-चांदीची भरारी, विदेशींची माघार अन् भारतीयांचा एल्गार! हे वर्ष कोणासाठी ठरलं फायद्याचं
5
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
6
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
7
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
8
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
9
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
10
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
11
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
12
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
13
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
14
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
15
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
16
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
17
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
18
प्रेयसीच्या नादात हिमांशू भारद्वाजने आधी विकली स्वतःची किडनी, नंतर रॅकेटमध्ये झाला सामील
19
४० किलो स्फोटकांचा वापर आणि २०२३ पासून सुरू होती तयारी; लाल किल्ला स्फोट प्रकरणात खळबळजनक खुलासा!
20
शाकंभरी नवरात्र २०२५: पौषात रविवारपासून सुरु होतोय शाकंभरी नवरात्रोत्सव; काय आहे महत्त्व आणि कुलाचार?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Municipal Election 2026: महायुतीत जागावाटपात तिढा कायम, ३६/३०/१५च्या फॉर्म्युल्यावर घमासान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 12:26 IST

महायुतीची बैठक बारगळली, सहा-सात जागांचा पेच कायम, मंगळवारीच नावे कळणार

कोल्हापूर : महापालिकेच्या निवडणुकीसाठी महायुतीकडून जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ राहणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. मात्र यावर निर्णय घेण्यासाठी शुक्रवारी होणारी महायुतीची बैठक बारगळली. महायुतीच्या उमेदवारांची नावे मंगळवारीच जाहीर होण्याची शक्यता आहे.महायुतीची पुण्यात बैठक, त्यानंतर भाजपची मुंबईत बैठक झाल्यानंतर बऱ्यापैकी जागा वाटप मार्गी लागल्याचे चित्र आहे. परंतु, अजूनही सहा, सात जागांचा पेच कायम आहे. काही ठिकाणी जागा कोणत्या पक्षाला यावर एकमत नाही तर काही ठिकाणी उमेदवारावर एकमत होईना, अशी स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी महायुतीच्या स्थानिक नेत्यांची बैठक होईल, अशी अटकळ होती. दुपारी १२ च्या सुमारास खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, प्रदेश सचिव महेश जाधव, महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्यासह पदाधिकारी चर्चेसाठी बसले होते. परंतु, पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्या वेळेचे गणित न जमल्याने ही बैठकच झाली नाही.

वाचा: कोल्हापूर महापालिकेत तिसरी आघाडी, वंचित-आप सर्व ८१ जागा लढवणारबैठक निश्चित झाली की कळवा असे हसन मुश्रीफ यांनी महायुतीच्या नेत्यांना सांगितले होते. परंतु, बैठकच न ठरल्याने त्यांना निरोप देण्याचा प्रश्नच आला नाही. एकीकडे ही स्थिती असली तरी दिवसभरामध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादीकडून चर्चा सुरूच ठेवली. याचाच एक भाग म्हणून त्यांनी आमदार अमल महाडिक आणि प्रा. जयंत पाटील यांच्याशी चर्चा केली. तर, शिंदेसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडे शहराध्यक्ष आदिल फरास यांना पाठवून फोनवरूनही चर्चा केली.

राष्ट्रवादीकडून २० जागांची मागणीराष्ट्रवादीकडून आम्ही २० जागांची मागणी केल्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. गेल्यावेळी राष्ट्रवादीचे १४ उमेदवार निवडून आले होते. मुश्रीफ यांची ही मागणी पूर्ण होण्याची शक्यता कमी असून काही कमी जागा घेऊन त्यांना तडजोड करावी लागणार असल्याची चिन्हे आहेत.

३६/३०/१५ च्या फॉर्म्युल्यावर घमासानभाजप ताराराणीचे गेल्या सभागृहात ३३ नगरसेवक होते आणि शिंदेसेनेचे ४ नगरसेवक होते. त्यामुळे सुरुवातीपासून भाजपने जादा जागांची केलेली मागणी अजूनही लावून धरली आहे. त्यामुळेच भाजप ३६, शिंदेसेना ३० आणि राष्ट्रवादी अजित पवार १५ असा फॉर्म्युला पुढे आला असून, यावरच घमासान सुरू आहे. आमदार क्षीरसागर हे जागा कमी घेण्यासाठी तयार नसल्याने या आकड्यांमध्ये थोडाफार फरक पडण्याची शक्यता असली, तरी भाजपच जागा वाटपात मोठा भाऊ ठरण्याची शक्यता आहे.जनसुराज्यचा विषय, भाजपच्या कोट्यातूनआमदार विनय कोरे यांनी जनसुराज्य शक्ती पक्षाकडूनही काही जणांच्या मुलाखती घेतल्या आहेत. त्यामुळे जनसुराज्यचा मुद्दा पुढे आला तर तो भाजपच्या कोट्यातून सोडवण्याची जबाबदारी भाजपची राहिल, असेही स्पष्ट करण्यात आले.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP Likely to Dominate Seat Sharing in Kolhapur Alliance

Web Summary : BJP is expected to lead seat allocation for Kolhapur Municipal elections. Negotiations continue among alliance partners, with disagreements over specific seats and candidates. Formula 36/30/15 is under discussion.
टॅग्स :Kolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरMunicipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६MahayutiमहायुतीBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार