शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
4
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
5
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
6
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
7
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
8
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
9
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
10
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
11
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
12
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
13
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
14
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
15
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
16
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
17
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
18
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur-बिद्री गर्भलिंग प्रकरण: गर्भपाताच्या गोळ्या पुरवणाऱ्या मेडिकलवाल्याचा शोध सुरु 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 19:09 IST

साक्षीदारांची पडताळणी सुरू

कोल्हापूर : बिद्री येथील श्रद्धा हॉस्पिटलमध्ये झालेल्या गर्भपातासाठी औषधे पुरविणाऱ्या मेडिकल चालकाचे नाव पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. लवकरच त्याच्यावर अटकेची कारवाई होणार आहे. त्याच्या चौकशीतून औषधांचा पुरवठा करणाऱ्या काही वितरकांची नावे समोर येणार आहेत. त्यामुळे गुन्ह्याची व्याप्ती आणखी वाढणार असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.स्वत:चा वैद्यकीय सेवेचा परवाना निलंबित असताना दुसऱ्या डॉक्टरांच्या परवान्यावर सुरू असलेल्या हॉस्पिटलमध्ये गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या युवराज पाटील याच्या तपासाची व्याप्ती वाढली आहे. डॉक्टरसह हॉस्पिटलमधील कर्मचारी आणि एजंट यांना अटक झाल्यानंतर त्यांना गर्भपाताकरिता गोळ्या पुरविणाऱ्यांचा शोध पोलिसांकडून सुरू होता. यात एका मेडिकल चालकाचे नाव निष्पन्न झाले असून, त्याचा शोध सुरू आहे.पोलिसांनी हॉस्पिटलवर कारवाई करताच मेडिकल चालक पसार झाला आहे. लवकरच त्याला अटक होईल, असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याच्या अटकेनंतर प्रतिबंधित औषधांचे वितरण करणारे वितरकही पोलिसांच्या रडारवर असतील. जिल्ह्यात प्रथमच गर्भलिंग निदान गुन्ह्याचा सखोल तपास सुरू असून, त्यातून मोठे रॅकेट उघडकीस येत आहे.आरोपींची संख्या वाढलीबिद्री येथील गर्भलिंग निदान प्रकरणी एकूण १३ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. यातील डॉ. उत्तमकुमार सरदेसाई आणि हॉस्पिटलमधील कर्मचारी आक्काताई कांबळे या दोघांना अद्याप अटक झालेली नाही. उर्वरित ११ आरोपी अटकेत असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे. मेडिकल चालकाचे नाव निष्पन्न झाल्याने त्याच्या चौकशीतून आणखी काही संशयितांची नावे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

साक्षीदारांची पडताळणी सुरूया गुन्ह्यात काही साक्षीदार पोलिसांना मिळाले आहेत. गर्भपातासाठी आलेल्या काही महिलांचा यात समावेश आहे. त्यांची पडताळणी करून जबाब नोंदविण्याचे काम सध्या पोलिसांकडून सुरू आहे. न्यायालयात गुन्हा सिद्ध करता यावा, यासाठी ठोस पुरावे गोळा केले जात आहेत. आरोपींना शिक्षेपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वतोपरी खबरदारी घेतली जात असल्याचे पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Medical Supplier Hunted in Abortion Pill Case

Web Summary : Police seek a medical supplier in the Kolhapur abortion case. Investigation widens, revealing a potential drug distribution racket. More arrests are expected.