शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
3
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
4
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
5
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
6
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
9
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
10
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
11
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
12
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
13
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
14
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
15
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
16
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
17
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
18
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
19
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
20
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

शासनाचा लेखी आदेश येईपर्यत जिल्ह्यातील शाळा बंद राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 15:50 IST

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि केंद्र सरकारने दि. ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवल्याने वर्ग सुरु करण्याबाबत शासनाकडून सुस्पष्ट लेखी आदेश प्राप्त होईपर्यत जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या खाजगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा बंद राहणार आहेत. त्याबाबतचा निर्णय जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ व कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाने बुधवारी घेतला.

ठळक मुद्देशैक्षणिक व्यासपीठ, मुख्याध्यापक संघाच्या बैठकीत निर्णय शासनाच्या दोन्ही आदेशांवर चर्चा

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि केंद्र सरकारने दि. ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवल्याने वर्ग सुरु करण्याबाबत शासनाकडून सुस्पष्ट लेखी आदेश प्राप्त होईपर्यत जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या खाजगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा बंद राहणार आहेत. त्याबाबतचा निर्णय जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ व कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाने बुधवारी घेतला.येथील विद्याभवनमध्ये शैक्षणिक व्यासपीठ आणि मुख्याध्यापक संघाची बैठक झाली. अध्यक्षस्थानी व्यासपीठाचे अध्यक्ष एस.डी.लाड होते. बैठकीच्या प्रारंभी शासनाच्या दि. १५ आणि २४ जूनच्या निर्णयाबाबत चर्चा करण्यात आली. शालेय शिक्षण विभागाने १५ जूनच्या शासन निर्णयात टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्याबाबतचा उल्लेख केला आहे.

शाळा सुरू करण्याबाबत शाळा समित्यांच्या बैठकीत मंजूरी घेऊन स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी असे सूचित केले. त्यानंतर २४ जूनच्या शासन निर्णयात शिक्षकांच्या उपस्थिती आणि अंमलबजावणीची माहिती होती. या आदेशामुळे शाळा सुरू करण्याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली.

सध्या शाळा सुरू करण्याबाबत कोणताही स्पष्ट आदेश नसताना मुख्याध्यापकांनी स्वतःच्या जबाबदारीवर शाळा सुरु करणे अडचणीचे आहे. याबाबत जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्याकडून सातत्याने विचारणा होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शाळा सुरु करण्याबाबत एकवाक्यता येण्यासाठी शासनाचे सुस्पष्ट लेखी आदेश प्राप्त होईपर्यत जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय एस.डी.लाड यांनी जाहीर केला.

या बैठकीस मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश संकपाळ, सचिव दत्ता पाटील, शिक्षक नेते दादा लाड, संस्थाचालक संघाचे सचिव प्रा. जयंत आसगावकर, कृती समितीचे कार्याध्यक्ष बाबा पाटील, शिवाजी माळकर, भरत रसाळे, सुधाकर निर्मळे, शिवाजी कोरवी, आदी उपस्थित होते. मिलिंद पांगिरेकर यांनी आभार मानले.

 

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकEducation Sectorशिक्षण क्षेत्रkolhapurकोल्हापूर