कोल्हापूर : जिल्ह्यात पंचगंगा नदीला येणाऱ्या पुराचा विचार करता करवीर, हातकणंगले, शिरोळ या तीन तालुक्यातील २७ गावातील शाळांना गरज पडल्यास उद्या बुधवारपासून सुट्टी देण्यात येणार आहे. याबाबतचे अधिकारी त्या त्या तालुक्याच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तसे पत्र जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी संबंधितांना पाठवले आहे. जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. धरण पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस असल्याने राधानगरी धरण ९५.५६ टक्के भरले आहे. धरणाचे स्वयंचलित दरवाजे कधीही उघडू शकतात. त्यामुळे पुन्हा पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे. दक्षता म्हणून या नदीकाठच्या तीन तालुक्यातील शाळांना सुट्टी देण्यात येणार आहे. मात्र याचा निर्णय स्थानिक परिस्थिती पाहून गटशिक्षणाधिकाऱ्यांना घ्यावयाचा आहे.२७ मार्गांवर एस.टी सेवा बंदसंततधार वृष्टीचा फटका एसटी बस सेवेला बसला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील २७ मार्गांवरील सेवा पूर्णत: बंद झाली आहे. तर ३ मार्गांवर पर्यायी मार्गाचा अवलंब करीत सेवा पुरविली जात आहे, अशी माहिती एसटीच्या कोल्हापूर विभागातर्फे देण्यात आली.पुणे-बंगळूरु महामार्गालगत शिरोली येथे सेवा मार्गावर पुराचे पाणीशिरोली येथे पुणे-बंगळूरु महामार्गा लगत पश्चिम बाजुस असलेल्या सेवा मार्गावर आज, सकाळी महापुराचे पाणी आले. पावसाचा जोर कायम राहिल्यास महामार्गावर पाणी येऊ शकते. सन २०१९ ला ८ दिवस तर २०२१ ला चार दिवस महामार्गावर पाणी आल्याने महामार्ग बंद होता. तसेच कसबा बावडा -शिये रोडवर पुराचे पाणी आले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास उद्या मार्ग बंद होण्याची शक्यता
कोल्हापूर जिल्ह्यातील २७ गावातील शाळांना गरज पडल्यास सुट्टी, जिल्हा परिषदेचा निर्णय
By समीर देशपांडे | Updated: July 25, 2023 19:00 IST