शहरं
Join us  
Trending Stories
1
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
2
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
3
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
4
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
5
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
6
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
7
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
8
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
9
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
10
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
11
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
12
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
13
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
14
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
15
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
16
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
17
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
18
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
19
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
20
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!

सांग सांग भोलानाथ पाऊस थांबेल का, पावणे तीन महिने एक सारखा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 4:13 PM

सततच्या पावसाने पिकांची मूूळे कमकुवत झाली असून सुर्य प्रकाशाविना अन्न निर्मिती मंदावल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे ‘सांग सांग भोलानाथ पाऊस थांबेल का’ अशी विचारण्याची वेळ सर्वांवर आली आहे.

ठळक मुद्देसांग सांग भोलानाथ पाऊस थांबेल का, पावणे तीन महिने एक सारखा पाऊसमाणसांसह पशु-पक्षीसह कंटाळलेत : पिके गारठली

कोल्हापूर : गेले पावणे तीन महिने कोल्हापूर जिल्ह्यात एक सारखा पाऊस सुरू आहे. सरासरीच्या आतापर्यंत तब्बल ७७ टक्के पाऊस झाला तरी पाऊस थांबण्याचे नाव घेईना. संततधार पावसाने माणसांसह पशु-पक्षी कंटाळली आहेत. सततच्या पावसाने पिकांची मूूळे कमकुवत झाली असून सुर्य प्रकाशाविना अन्न निर्मिती मंदावल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे ‘सांग सांग भोलानाथ पाऊस थांबेल का’ अशी विचारण्याची वेळ सर्वांवर आली आहे.कोल्हापूर जिल्ह्यात ‘उन्हाळा’, ‘हिवाळा’ व ‘पावसाळा’ हे तिन्ही ऋतु तसे जेमतेम असतात. कडक उन्हाळा, गोठवणारी थंडी आणि अतिवृष्टी या तिन्ही गोष्टी फारशा अनुभवायास येत नाहीत. जिल्ह्यात पाऊस जास्त पडत असला तरी पावसाचे एखादे नक्षत्र जास्त बरसले तर दुसरे कोरडे जाते. त्यामुळे माणसांना थोडी उसंत मिळते आणि पिकांना वापसा मिळतो.

पिकांना सुर्यप्रकाश मिळाल्याने वाढ जोमात होऊन खरीपाचे उत्पादनही चांगले मिळते. पण यावर्षी मान्सूनची लहर काही वेगळीच आहे. यंदा ८ जून ला ‘मृग’ नक्षत्र सुरू झाले असले तरी जूनच्या दोन तारखेपासूनच पावसाची भुरभुर सुरू झाली होती. त्यानंतर तीन-चार दिवसाचा अपवाद वगळता सर्वच नक्षत्र काळात जोरदार पाऊस झाला आहे.साधारणता पुनर्वसू (तरणा पाऊस) आणि ‘पुष्य’ (म्हातारा पाऊस) काळातच आपल्याकडे जोरदार वृष्टी होते. पण गेले पावणे तीन महिने कमी-अधिक प्रमाणात का असेना पण पाऊस थांबलेलाच नाही. आता पर्यंत जिल्ह्यात १६५०० मिली मीटर पाऊस कोसळला आहे. वार्षिक सरासरीच्या तब्बल ७७ टक्के पाऊस पावणे तीन महिन्यातच झाला आहे.

पावसाने उसंत न घेतल्याने डोंगर जमिनीत पाणी मुरूण्याची प्रक्रिया हळूवार सुरू आहे. त्यामुळे पावसाचा पडेल तो थेंब प्रवाहीत होतो, आणि पाणी सैरभैर होते. परिणामी शिवारात बघेल तिकडे पाणीच पाणी पसरलेले पहावयास मिळत आहे. त्यात धरणे तुडूंब झाल्याने त्यातून एक सारखा विसर्ग सुरू आहे.

नद्यांच्या पाणी पातळी वाढू लागली आहे. नदी काठावरील पिकांतून गेले दीड महिना पाणीच हललेले नाही. नदीकाठचे ऊस, भात ही पिके कुूजू लागली आहेतच पण डोंगर माथ्यावरील गवतही खराब झाले आहे. पशु-पक्षी गारठून गेली असून दूध उत्पादनांवरही परिणाम झाला आहे. एकूणच पावसाने अक्षरशा दैना उडवून दिल्याने सांग सांग भोलानाथ पाऊस थांबेल का? अशी म्हणण्याची वेळ सर्वांवर आली आहे.

डोंगर, कपाऱ्या उगळल्या!जमिनीतील पाण्याची पातळी समतोल झाली की त्यातून पाणी पाझरणे सुरू होते. गेले वर्षी फार काळ डोंगर, कपाऱ्यांतून धो धो वाहणारे झरे पहावयास मिळाले नाहीत. पण जूलैच्या पहिल्या आठवड्यात सुरू झालेले झरे अद्याप एक सारखे ओसांडून वाहत आहेत.

११०० मालमत्तांचे अडीच कोटीचे नुकसानधुवांदार पावसाने खासगी, सार्वजनिक मालमत्ता नुकसानीसह जिवीतहानीही मोठ्या प्रमाणात झाली आहे. जिल्ह्यात १०९७ खासगी तर ११ सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान होऊन २ कोटी ५३ लाख ३७ हजाराचे नुकसान झाले आहे. 

 

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018kolhapurकोल्हापूर