बापूजी साळुंखेंची खुर्ची जतन करून ‘रयत’ने भावनिकता जपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:21 IST2021-01-22T04:21:47+5:302021-01-22T04:21:47+5:30
हातकणंगले : रयत शिक्षण संस्थेत शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी पहिले मुख्याध्यापक म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी स्वामी विवेकानंद ...

बापूजी साळुंखेंची खुर्ची जतन करून ‘रयत’ने भावनिकता जपली
हातकणंगले : रयत शिक्षण संस्थेत शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी पहिले मुख्याध्यापक म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना केली. रयत शिक्षण संस्थेच्या रुकडीच्या शैक्षणिक संकुलात डॉ. बापूजींची खुर्ची-टेबल जतन करून दोन संस्थेतील भावनिक ओलावा जपला आहे, ही बाब अभिमानास्पद आहे, असे प्रतिपादन स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी केले.
रुकडी (ता. हातकणंगले) येथील रयत शिक्षण संस्थेच्या संकुलातील डॉ. बापूजींच्या जतन केलेल्या आसनावर डॉ. बापूजी साळुंखे यांची प्रतिमा व जीवनपट अर्पण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून प्राचार्य अभयकुमार साळुंखे बोलत होते.
प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी ‘रयत’चे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील व स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या सहवासातील हृद्य आठवणी सांगितल्या. संस्थेचे आजीव सेवक श्रीराम साळुंखे, रयतेचे उपप्राचार्य जे. के. जाधव, पर्यवेक्षक एम. एम. हजारे यांची मनोगते झाली. माजी सहसचिव प्राचार्य भाऊसाहेब अपराध, प्राचार्य आर.ए. भोजकर, प्राचार्य भूपाल कुंभार, आय.वाय. मुल्ला, महानंदा कदम, प्रदीपकुमार पाटील, कौस्तुभ गावडे, कमल माणकापुरे, ए.एम. पाटील, राजेंद्र काकडे, ए.जी. मुजावर आदी उपस्थित होते. महेंद्र स्वामी यांनी सूत्रसंचालन केले. एम.एम. हजारे यांनी आभार मानले.
फोटो ओळी : रुकडी (ता. हातकणंगले) येथील रयत शिक्षण संस्थेच्या संकुलातील डॉ. बापूजींच्या जतन केलेल्या आसनावर डॉ. बापूजी साळुंखे यांची प्रतिमा व जीवनपट अर्पण कार्यक्रमप्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, श्रीराम साळुंखे व गुरुदेव कार्यकर्ते उपस्थित होते.