शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
3
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
4
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
5
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
6
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
7
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
8
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
9
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
10
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
11
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
12
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
13
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
14
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
16
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
17
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
18
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
19
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
20
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."

सत्यजित कदम यांच्यावर पाच कोटींचा दावा : राजेश क्षीरसागर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 11:17 AM

कदमवाडी येथील लेआऊटमध्ये माझ्याकडून ७५ लाखांचा निधी देऊन त्यात भ्रष्टाचार केल्याचा बेछूट आरोप करणाऱ्या नगरसेवक सत्यजित कदम उर्फ नाना यांनी ते सिद्ध करून दाखवावेत, अन्यथा त्यांच्यावर पाच कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यासाठी लागणारे पाच लाख रुपये भरण्यास आपण तयार असल्याचेही क्षीरसागर यांनी सांगितले

ठळक मुद्देसत्यजित कदम यांच्यावर पाच कोटींचा दावा : राजेश क्षीरसागर भ्रष्टाचार केल्याचा आरोप बेछूट, सिद्ध करून दाखवा

कोल्हापूर : कदमवाडी येथील लेआऊटमध्ये माझ्याकडून ७५ लाखांचा निधी देऊन त्यात भ्रष्टाचार केल्याचा बेछूट आरोप करणाऱ्या नगरसेवक सत्यजित कदम उर्फ नाना यांनी ते सिद्ध करून दाखवावेत, अन्यथा त्यांच्यावर पाच कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यासाठी लागणारे पाच लाख रुपये भरण्यास आपण तयार असल्याचेही क्षीरसागर यांनी सांगितले.विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या धक्क्यातून ते सावरले नसून, त्यांना मानसोपचार तज्ज्ञांच्या उपचाराची आवश्यकता असल्याची टीका त्यांनी केली. नगरसेवक कदम यांनी केलेल्या आरोपांना आमदार क्षीरसागर यांनी प्रत्युत्तर दिले.

ते म्हणाले, नागरिकांकडून कामांची मागणी झाल्यानंतर जिल्हा नियोजनमध्ये त्या कामाचे इस्टिमेट होते. त्यानंतर शासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ठेकेदाराला बिल दिले जाते. त्यामध्ये आमदाराचा संबंध येत नाही; पण शहानिशा न करता काहीही आरोप करायचे, ही कदम यांची संस्कृती आहे. लक्ष्मीपुरीत व्यापाऱ्यांच्या तक्रारीवरून आम्ही आंदोलने केली. आम्ही लोकांसाठी लढतो, तर नाना जनतेला लुटण्यासाठी लढतात,असा टोला क्षीरसागर यांनी लगावला. 

टॅग्स :Rajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागरkolhapurकोल्हापूर