शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

Hatkanangle Lok Sabha Constituency: साखरपुडा झाला पण लग्न झालं नाही; सतेज पाटील यांची मिश्किल टिपण्णी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2024 4:41 PM

कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे पाठिंबा मागितला होता. ...

कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे पाठिंबा मागितला होता. मात्र यावर तोडगा न निघाल्याने उद्धव ठाकरे गटाने याठिकाणी सत्यजित पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. यामुळे या मतदारसंघात आता चौरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावर काँग्रेस नेते, आमदार सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. सतेज पाटील म्हणाले, की ही जागा शिवसेनेच्या वाट्याची असल्याने त्यांनी निर्णय घ्यावा हे अपेक्षित आहे. राजू शेट्टींच्या चर्चेला अंतिम स्वरूप देता आले नाही. या मतदारसंघात महाविकास आघाडीची ताकद आहे. राजू शेट्टी यांनी आमच्यासोबत यावे, अशी आमची इच्छा होती. मात्र, साखरपुडा झाला पण लग्न झालं नाही असे मिश्किलपणे टिपण्णी सतेज पाटील यांनी केली. सांगलीवर तोडगा निघेल महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेवरून तिढा निर्माण झाला आहे. याठिकाणी ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी आहे. याबाबत बोलताना पाटील यांनी विश्वजित कदम यांचा या जागेसाठी प्रामाणिक प्रयत्न असून त्यांची नाराजी स्वाभाविक असल्याचे सांगत यावर वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असून लवकर या संदर्भातील तोडगा निघेल अशी आशा व्यक्त केली. शक्तीपीठ महामार्ग ठेकेदार धार्जिण शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांमधून तीव्र विरोध सुरु आहे. यावर बोलताना पाटील यांनी सरकार टीका केली. ठेकेदार धार्जिण हा मार्ग असून शेतकऱ्यांना उध्वस्त करण्यासाठी हा मार्ग केला जात असल्याचे ते म्हणाले. कोल्हापूर धाराशिव जिथून हा महामार्ग जात आहे तेथील शेतकऱ्यांचा मोठा विरोध आहे, त्यामुळे हा महामार्ग रद्द करून पर्यायी मार्गांचा विचार केला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. या महामार्गावर पैसे खर्च करण्यापेक्षा तीर्थक्षेत्रावर पैसे खर्च करा अशी मागणीही पाटील यांनी यावेळी केली. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरlok sabhaलोकसभाhatkanangle-acहातकणंगलेRaju Shettyराजू शेट्टीSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील