सातारा :एस कॉर्नरवरील त्या अपघातातील आणखी एकाचा मृत्यू, मृतांची संख्या १९ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 12:32 IST2018-04-13T12:32:42+5:302018-04-13T12:32:42+5:30

पुणे-बेंगलोर महामार्गावरील एस कॉर्नरवर मंगळवारी पहाटे झालेल्या अपघातात जखमी झालेल्यांपैकी एका महिलेचा उपचारादरम्यान, मृत्यू झाला आहे. त्यामुळे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता १९ वर पोहोचली आहे.

Satara: The death of one of the passengers on the S's Corner, the death toll in 19 | सातारा :एस कॉर्नरवरील त्या अपघातातील आणखी एकाचा मृत्यू, मृतांची संख्या १९ वर

सातारा :एस कॉर्नरवरील त्या अपघातातील आणखी एकाचा मृत्यू, मृतांची संख्या १९ वर

ठळक मुद्देएस कॉर्नरवरील त्या अपघातातील आणखी एकाचा मृत्यूमृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता पोहोचली १९ वर

सातारा : पुणे-बेंगलोर महामार्गावरील एस कॉर्नरवर मंगळवारी पहाटे झालेल्या अपघातात जखमी झालेल्यांपैकी एका महिलेचा उपचारादरम्यान, मृत्यू झाला आहे. त्यामुळे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता १९ वर पोहोचली आहे.

याबाबत माहिती अशी की, विजापूरहून भोरच्या दिशेने जाणारा मजुरांचा टेम्पो मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास बेंगरुटवाडी, ता. खंडाळा येथे पलटी झाला. यात भीषण अपघात १८ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर १७ जण गंभीर जखमी झाले होते.

जखमींना सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारसाठी पुणे व विजापूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले होते. दरम्यान, गुरुवारी रात्री उशिरा जम्मी बाई राठोड (रा. मदभाई तांडा, जि. विजापूर) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे अपघातात मृत्यू झालेल्यांची संख्या १९ वर पोहोचली असून, १६ जणांवर उपचार सुुरू आहेत.
 

Web Title: Satara: The death of one of the passengers on the S's Corner, the death toll in 19