शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच निवड पुढे ढकलली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:23 IST

कुरुंदवाड : सरपंच आरक्षण सोडतीवर आक्षेप घेत काही गावांनी सोडत न्यायप्रविष्ट केल्याने सरपंच निवड अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली आहे. ...

कुरुंदवाड : सरपंच आरक्षण सोडतीवर आक्षेप घेत काही गावांनी सोडत न्यायप्रविष्ट केल्याने सरपंच निवड अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी सहलीवर गेलेले सदस्य परतीच्या मार्गाला लागले आहेत. तर सदस्य सांभाळण्यासाठी गटनेत्यांची डोकेदुखी वाढली आहे.

ग्रामपंचायतीतील सत्तेसाठी स्थानिक गटनेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावल्याने तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका अत्यंत अटीतटीच्या झाल्या. काही ठिकाणी सत्तांतर तर काहींना काठावरचे बहुमत मिळाले आहे.

निवडणुकीनंतरच सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले. आरक्षणानुसार सरपंच पदासाठी गटाअंतर्गत चढाओढ, खलबते व सदस्य फोडाफोडीच्या राजकारणाला गती आली होती. मंगळवारी (दि. ९) सरपंच निवड जाहीर झाल्याने बहुतेक गावातील सदस्य विशेषत: काठावर बहुमत असणाऱ्या सदस्यांना सुरक्षितता म्हणून गटनेत्यांनी सहलीवर पाठविले आहेत. मात्र, तालुक्यातील शिरटी व मजरेवाडी गावातील काहींनी सरपंच आरक्षण पध्दतीवर आक्षेप घेत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने आरक्षण सोडत न्यायप्रविष्ठ बनली आहे.

हा वाद निकाली लागेपर्यंत सरपंच निवड १६ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलल्याचे व त्यानंतर तारीख निश्चित करण्याचे आदेश तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे यांनी दिल्याने राजकीय नेत्यांची तारांबळ उडाली आहे.

सरपंच निवड अनिश्चित काळासाठी पुढे गेल्याने व तारीख निश्चितीपर्यंतचा सदस्यांचा खर्च पेलणे अशक्य असल्याने सहलीवर गेलेले सदस्य परतीच्या मार्गाला लागले आहेत. निवडीसाठी बहुमत टिकवून ठेवण्याचे आव्हान गटनेत्यांपुढे असून गटनेत्यांची डोकेदुखी वाढली आहे.