संतोष ट्रॉफी: महाराष्ट्राकडून अंदमान-निकोबारचा सलामीलाच धुव्वा, तब्बल ८ गोलनी पराभव 

By सचिन भोसले | Updated: October 13, 2023 12:23 IST2023-10-13T12:21:47+5:302023-10-13T12:23:04+5:30

कोल्हापूर : निखिल कदमच्या दोन, संकेत साळुंखे ची एक आणि  यजमान महाराष्ट्र संघाने अंदमान - निकोबार संघाचा ८- ० ...

Santosh Trophy: Andaman-Nicobar defeated Maharashtra by 8 goals | संतोष ट्रॉफी: महाराष्ट्राकडून अंदमान-निकोबारचा सलामीलाच धुव्वा, तब्बल ८ गोलनी पराभव 

छाया-नसीर अत्तार

कोल्हापूर : निखिल कदमच्या दोन, संकेत साळुंखे ची एक आणि  यजमान महाराष्ट्र संघाने अंदमान - निकोबार संघाचा ८- ० असा धुव्वा उडवीत ७७ व्या संतोष ट्रॉफी राष्ट्रीय स्पर्धेतील एफ गटात विजयी सलामी दिली. कोल्हापुरातील छत्रपती शाहू स्टेडियमवर आज, शुक्रवारपासून सुरू झालेल्या या स्पर्धेतील गटात सलामीची लढत यजमान महाराष्ट्र व अंदमान निकोबार याच्यात झाली. 

सामन्याच्या सुरुवातीपासूनच महाराष्ट्र संघाने  सुरुवातीपासूनच वर्चस्व ठेवले. अचूक नियोजन, खोलवर चढाया करीत संपूर्ण नव्वद मिनिटांच्या खेळात चेंडू सातत्याने अंदमान निकोबार संघाच्या गोल क्षेत्रातच राहिला.महाराष्ट्राच कर्णधार निखिल कदमने १९ व २० व्या मिनिटाला सलग दोन गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. २७ व्या मिनिटाला हिमांशू पाटीलने तर जॉन्सन मॅथ्यू ने ३० व्या मिनिटाला गोल केला. 

४५ व्या मिनिटाला हिमांशू पाटीलने वैयक्तिक दुसरा गोल केला. ५९ व्या मिनिटाला अद्वैत शिंदेने तर  ६७ व्या मिनिटाला ध्रुवंश निजपने व  ७९ व्या मिनिटाला संकेत साळोखेने गोल करत महाराष्ट्र संघाची आघाडी आठ गोलपर्यंत नेली. हा सामना महाराष्ट्र संघाने जिंकत एक गटात विजेतेपदाची दावेदार असल्याची पहिल्याच सामन्यात दाखवून दिले.

Web Title: Santosh Trophy: Andaman-Nicobar defeated Maharashtra by 8 goals