मूळ गाव बार्शी असणारे घोळवे यांनी २००६ पासून पोलीस दलात सेवेत आहेत. रायगड, अलिबाग, नागपूर शहर, पुणे शहर, पिंपरी चिंचवड, मुंबई सेवा केली आहे. दोन वर्षे एस.आय. टी. मुंबईला ही सेवा बजावली आहे. १२ जून २०१९ ला पोलीस निरीक्षक म्हणून पदोन्नती झाली होती. मुंबई येथून कोल्हापूर नियंत्रण कक्षात कार्यरत होते. पोलीस निरीक्षक प्रदीप काळे हे बार्शीचे होते. काळे यांनी वडगाव पोलीस ठाण्यात २२ ऑगस्ट २०१८ ला नेमणूक झाली होती. दरम्यान प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी बी धीरजकुमार हे तीन महिन्यांसाठी येथे नेमणूक झाली होती. येथे नेमणूक कोणाची होणार याबाबत अनेक नावे चर्चेत असताना, तसेच इच्छुकांनी फिल्डिंग लावली असतानाच घोळवे यांनी शुक्रवारी रात्री पदभार स्वीकारला.
२३ संतोष घोळवे