डीवायपीमध्ये संत गाडगे महाराज जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:26 IST2021-02-24T04:26:24+5:302021-02-24T04:26:24+5:30

कसबा बावडा : येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची जयंती ...

Sant Gadge Maharaj Jayanti celebration at DYP | डीवायपीमध्ये संत गाडगे महाराज जयंती साजरी

डीवायपीमध्ये संत गाडगे महाराज जयंती साजरी

कसबा बावडा : येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता यांच्याहस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिष्ट्रार डॉ. लितेश मालदे, डीन स्टुडंट अफेअर्स डॉ. अजितसिंह जाधव, जिमखाना विभागप्रमुख डॉ. राजेंद्र रायकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रमोद चौगुले, सहा. कार्यक्रम अधिकारी डॉ. राहुल पाटील, सर्व विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

दरम्यान, संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या २५० विद्यार्थ्यांनी सोशल डिस्टन्सचे पालन करत कसबा बावड्यातील प्रत्येक गल्लीत घरोघरी जाऊन लोकांकडून नको असलेले प्लास्टिक गोळा करून महानगरपालिकेच्या कचरा गाडीमध्ये संकलित केले व लोकांना मास्क वापरण्याचे आवाहन केले. या उपक्रमास कसबा बावडा व लाईनबझार परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व विद्यार्थांचे कौतुकही केले. ..................

२३ बावडा गाडगे महाराज जयंती

फोटोओळ -

संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता यांनी केले. यावेळी प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिष्ट्रार डॉ. लितेश मालदे, डॉ. अजितसिंह जाधव, डॉ. राजेंद्र रायकर, डॉ. प्रमोद चौगुले, डॉ. राहुल पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Sant Gadge Maharaj Jayanti celebration at DYP