संजय मंडलिक-संभाजीराजे छत्रपती समोरासमोर आले, संभाजीराजेंनी टिप्पणी करताच सारे हास्यकल्लोळात बुडाले-video
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2024 17:37 IST2024-04-05T17:37:06+5:302024-04-05T17:37:44+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शाहू महाराज छत्रपती तर महायुतीकडून संजय मंडलिक यांना उमेदवारी जाहीर झाली ...

संजय मंडलिक-संभाजीराजे छत्रपती समोरासमोर आले, संभाजीराजेंनी टिप्पणी करताच सारे हास्यकल्लोळात बुडाले-video
कोल्हापूर: कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शाहू महाराज छत्रपती तर महायुतीकडून संजय मंडलिक यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. दोन्ही उमेदवारांनी आपला प्रचार देखील सुरु केला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांचे सुपुत्र संभाजीराजे छत्रपती आपल्या वडिलांच्या प्रचारासाठी गावे पिंजून काढत आहेत. तर महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी देखील मतदार, कार्यकर्त्यांची भेटीगाठी सुरु केल्या आहेत.
दरम्यानच, संजय मंडलिक आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांची काल, गुरुवारी दुपारी सरवडे (ता. राधानगरी) येथे समोरासमोर भेट झाली. तत्पूर्वी खासदार मंडलिक बाळूमामाचे दर्शन घेऊन कपाळाला भंडारा लावून आले होते. या दोन नेत्यांत हस्तांदोलन झाल्यावर संभाजीराजे यांनी तुमचा भंडारा जरा आम्हालाही लावा, अशी टिप्पणी करताच सारे हास्यकल्लोळात बुडाले. विजयसिंह मोरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणदिनी अभिवादन करण्यासाठी हे दोघेही तिथे गेले होते. या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला.