बॅटऱ्या चोरणाऱ्या सांगलीच्या तरुणास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:28 IST2021-08-27T04:28:07+5:302021-08-27T04:28:07+5:30

जयसिंगपूर : वाहनातील बॅटऱ्या चोरणाऱ्या तरुणास जयसिंगपूर पोलिसांनी अटक केली. सुरेश शिवाजी गोसावी (वय ३०, रा. लक्ष्मीनगर, जुना बुधवार ...

Sangli youth arrested for stealing batteries | बॅटऱ्या चोरणाऱ्या सांगलीच्या तरुणास अटक

बॅटऱ्या चोरणाऱ्या सांगलीच्या तरुणास अटक

जयसिंगपूर : वाहनातील बॅटऱ्या चोरणाऱ्या तरुणास जयसिंगपूर पोलिसांनी अटक केली. सुरेश शिवाजी गोसावी (वय ३०, रा. लक्ष्मीनगर, जुना बुधवार रोड, सांगली) असे संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून १४ बॅटऱ्या व मोटारसायकल असा एकूण ५१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गोसावी हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.

याबाबत माहिती अशी की, स्वप्ननगरी येथील दीपक बबन पाटील यांच्या घरासमोरुन कारमधील बॅटरी ९ ऑगस्ट रोजी चोरीला गेली होती. चोरीप्रकरणी गुन्हे शोध पथकाला खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपी गोसावी हा जयसिंगपूर येथे आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मागील बाजूस सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आल्यानंतर संशयिताने गुन्ह्याची कबुली दिली.

फोटो - २६०८२०२१-जेएवाय-०१

फोटो ओळ - जयसिंगपूर पोलिसांनी बॅटऱ्या चोरी करणाऱ्या संशयिताला मुद्देमालासह अटक केली.

Web Title: Sangli youth arrested for stealing batteries