शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

सांगली : आगामी निवडणुका मतपत्रिकेवर घ्या ; रविकांत तुपकर यांचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 1:44 PM

देश व राज्यातील भाजपचे सरकार फसवे असून, त्यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी आगामी निवडणुका या मतदान पत्रिकेवर घ्याव्यात, असे आव्हान स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी पत्रकार बैठकीत दिले. तसेच आगामी लोकसभा, विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

ठळक मुद्देलोकसभा, विधानसभा स्वबळावर लढविणार; रविकांत तुपकर आगामी निवडणुका मतदान पत्रिकेवर घ्या ; रविकांत तुपकर यांचे आव्हान

इस्लामपूर : देश व राज्यातील भाजपचे सरकार फसवे असून, त्यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी आगामी निवडणुका या मतदान पत्रिकेवर घ्याव्यात, असे आव्हान स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी पत्रकार बैठकीत दिले. तसेच आगामी लोकसभा, विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष भागवत जाधव यांच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे त्यांच्या परिवाराचे सांत्वन करण्यासाठी तुपकर इस्लामपूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला.

ते म्हणाले, राज्यातील लोकसभेच्या सात जागा स्वबळावर लढविण्याचा निर्णय झाला आहे. त्यामध्ये हातकणंगले, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, माढा, धुळे—नंदुरबार या मतदारसंघांचा समावेश आहे. विधानसभेबाबत विभागनिहाय कार्यकारिणी बैठका घेऊन उमेदवार चाचपणी करीत आहोत.स्वाभिमानीने कधीही जाती—पातीचे राजकारण केले नाही. ज्यांना पदे दिली, ते सर्व कार्यकर्ते बहुजन समाजातील आहेत. चळवळीत कधी जात बघितली जात नाही. स्वाभिमानीच्या प्रत्येक आंदोलनाचा सर्व जाती—धर्मातील शेतकऱ्यांना लाभ झाला आहे.

मात्र या विभागात भाजपचा एक मोठा नेता काही असंतुष्ट कार्यकर्त्यांना रसद पुरवून स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट पाडण्याचा डाव खेळत आहे. तो यशस्वी होणार नाही. पेठवडगाव येथे झालेला मेळावा हा भाजप पुरस्कृत असल्याचा आरोप रविकांत तुपकर यांनी केला.

टॅग्स :Ravikant Tupkarरविकांत तुपकरSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाSangliसांगलीElectionनिवडणूक