शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

संदीप नरकेंचा नाट्यमय ‘यू टर्न’

By admin | Updated: December 17, 2015 01:41 IST

कुंभीचे रणांगण : सहानुभूती हरपली; रात्रीत निर्णय बदलला

कोपार्डे : नाट्यमयरीत्या माघार घेत संदीप नरके यांनी सर्वांनाच धक्का दिला; पण एका रात्रीत ‘यू टर्न’ घेत पुन्हा रिंंगणात राहण्याच्या घेतलेल्या निर्णयाने त्यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. संदीप नरके यांनी घरात बंड करीत ‘कुंभी’च्या मैदानात शड्डू ठोकला होता; पण नरके यांनी आपली भूमिका जाहीर केल्यापासून त्यांच्या भूमिकेविषयीच कार्यक्षेत्रातून शंका घेतली जात होती. ते शेवटपर्यंत रिंगणात राहणार नाहीत, अशी चर्चा रंगत होती. त्यांनी मेळावे, संपर्कभेटींच्या माध्यमातून वातावरण निर्मिती केली. विरोधी गटाची एकत्रित मोट बांधण्याचा प्रयत्न केला; पण करायचे तेच केले. शेवटच्या क्षणी माघार घेत असल्याची घोषणा केली. माघारीच्या वेळेनंतर त्यांनी अर्ज दाखल केल्याने तांत्रिकदृष्ट्या त्यांची माघार होऊ शकली नाही. त्यांनी माझ्या राजकारणाचा शेवटचा दिवस असल्याचे सांगत माघारीच्या ठिकाणी भावनिक वातावरण निर्मिती केली होती; पण एका रात्रीत त्यांनी ‘यू टर्न’ घेत चिन्हवाटपाच्या दिवशी निवडणूक कार्यालयात हजेरी लावत सर्वांनाच धक्का दिला. नरके तिथे आल्यानंतर विरोधी बचाव मंचच्या नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; पण आपण अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले. संदीप नरके यांच्या या भूमिकेची चर्चा मात्र कुंभी परिसरात सुरू असून, माघारीनंतर त्यांच्याविषयी असणारी सहानुभूती आता चेष्टेत बदलली आहे. रडायचे नाही, लढायचे...!माघार घेतल्यानंतर आपण रात्रभर छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुस्तक वाचले. त्यामध्ये छत्रपतींनी ‘रडायचे नाही, लढायचे...’ असे आपल्या मावळ्यांना सांगितल्याचे वाचले. त्यातून स्फूर्ती घेऊन आपण माघारीचा विचार बदलल्याचे संदीप नरके यांनी माघारीच्या ठिकाणी सांगून आणखी एक धक्का दिला. कदाचित अण्णांची इच्छा असावी...एवढ्या घडामोडी होऊन, माघारीनंतरही मी रिंगणात राहतोय, हे पाहता माझे आजोबा स्व. डी. सी. नरके यांची आपण कारखान्यात संचालक म्हणून जावे, अशी कदाचित इच्छा असावी, असेही संदीप नरके यांनी सांगितले. नरके पॅनेलला ‘अंगठी,’ तर ‘बचाव’ला कपबशीबुधवारी चिन्हवाटपामध्ये नरके पॅनेलला ‘अंगठी,’ तर ‘कुंभी बचाव मंच’ला ‘कपबशी’ हे चिन्ह मिळाले. संदीप नरके यांना ‘पतंग’ चिन्ह मिळाले.