शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
2
Top Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
3
Success Story: १०,००० पगार ते ४०० कोटींचा व्यवसाय, कसा होता ब्रॉडबँड सेवा पुरवणाऱ्या जम्मू काश्मीरच्या विवेक रैनांचा प्रवास?
4
गोरखपूर ट्रेन नाही, रत्नागिरी पॅसेंजरमुळे ८ लोकलला फटका; दादरला येणार की नाही? मध्य रेल्वे म्हणते…
5
होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... 
6
Ashok Kharat : भोंदू खरातने फरार पत्नीला माहेरी जाण्यासाठी १६ वर्ष रोखलं; नातेवाईकांचा धक्कादायक खुलासा
7
'पीएम किसान'चे २,००० रुपये खात्यात जमा होण्यासाठी 'या' ३ अटी पूर्ण करणे अनिवार्य; मोबाईलवरुनही प्रोसेस होईल
8
अमेरिकेचे F-35 विमान इराणने पाडले! १५ दिवसांत दुसऱ्या फायटर जेटचा गेम; युद्धभूमीवर खळबळ
9
आता इंधनाबरोबरच खतांचं टेन्शनही संपणार! संकट काळात 'खास मित्र' भारताच्या मदतीला, PM मोदींना भेटून दिलं मदतीचं आश्वासन
10
वर्षभरानंतर सतीश भोसले उर्फ 'खोक्या' तुरुंगाबाहेर; मारहाण प्रकरणात न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
11
हृदयद्रावक! गॅस टंचाईमुळे अनेक रेस्टॉरंट्स बंद; काम न मिळाल्याने शेफची आत्महत्या
12
एक युद्धनौका, एक अण्वस्त्रवाहू पाणबुडी...! दोन्ही शिकारी जगापासून अदृष्यच राहणार, भारताच्या संरक्षण मंत्र्यांची पोस्ट अन् चीन, पाकिस्तानात खळबळ... 
13
पाकिस्तानला दुबईचा दणका! १७ एप्रिलपर्यंत २ अब्ज डॉलर्स परत करा; युएईच्या अल्टिमेटमने शाहबाज शरीफ सरकार हादरले
14
आपने केलेल्या कारवाईनंतर पहिल्यांदाच बोलले राघव चड्डा, म्हणाले, ‘’माझ्या मौनाला…” 
15
"होर्मुझमध्ये फक्त आमचेच नाविक मारले गेले..."; ६० देशांच्या बैठकीत भारत स्पष्टच बोलला, दिला मोठा इशारा!
16
सोने-प्लॅटिनमच्या आयातीवर कडक निर्बंध! आता 'लायसन्स'शिवाय इंपोर्ट अशक्य; दागिन्यांच्या किमती वाढणार?
17
भारत-पाकिस्तानच्या पडद्याआड चर्चा सुरू! 'ट्रॅक-2' बैठकीत दोन्ही देश आमनेसामने, कारण काय...
18
Numerology: तुमचा स्वभाव 'बोल्ड' आहे की लाजाळू? जन्मतारखेनुसार ओळखा बलस्थान,व्यक्तिमत्त्वाला द्या झळाळी!
19
नाशिकमध्ये हायप्रोफाईल ब्लॅकमेलिंग; जेष्ठ व्यक्तीच्या टॅबमधील 'त्या' अश्लील व्हिडिओसाठी १२ लाखांची खंडणी
20
Ashok Kharat : "कुटुंबात वाईट घटना, मृत्यूची भीती"; खरातने लाखो रुपये उकळलेले, कवडीमोल भावात जमीन खरेदी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर-मुंबई विमानसेवा उद्यापासून, संभाजीराजे यांची माहिती; एअर डेक्कन कंपनीचे पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 12:22 IST

उडान योजनेत कोल्हापूरचा समावेश झाल्यानंतर एअर डेक्कन कंपनीची कोल्हापूर ते मुंबई विमानसेवा सुरू झाली आणि दोन महिन्यातच बंद पडली. त्यानंतर खासदार संभाजीराजे यांनी ही विमानसेवा सुरू होण्यासाठी दिल्लीत पाठपुरावा केला आहे. एअर डेक्कन कंपनीशी चर्चा केली.

ठळक मुद्देकोल्हापूर-मुंबई विमानसेवा उद्यापासूनसंभाजीराजे यांची माहिती; एअर डेक्कन कंपनीचे पत्र

कोल्हापूर : उडान योजनेत कोल्हापूरचा समावेश झाल्यानंतर एअर डेक्कन कंपनीची कोल्हापूर ते मुंबई विमानसेवा सुरू झाली आणि दोन महिन्यातच बंद पडली. त्यानंतर खासदार संभाजीराजे यांनी ही विमानसेवा सुरू होण्यासाठी दिल्लीत पाठपुरावा केला आहे. एअर डेक्कन कंपनीशी चर्चा केली. त्यावर कोल्हापूरची विमानसेवा रविवारी (दि. २९) पुन्हा सुरू करणार असल्याचे पत्राद्वारे कळविले आहे, अशी माहिती खासदार संभाजीराजे यांनी दिली.नागरिकांच्या चांगल्या प्रतिसादानंतरही एअर डेक्कन कंपनी ‘कोल्हापूर ते मुंबई’ विमानसेवा सुरळीतपणे चालू ठेवण्यासाठी अपयशी ठरली आहे; त्यामुळे रविवारनंतर जर ही कंपनी आठवड्यातील तीन दिवस विमानसेवा देण्यास असमर्थ ठरली, तर त्यांचा करार रद्द करावा, अशी मागणी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू आणि या खात्याचे राज्यमंत्री जयंत सिन्हा यांना भेटून त्यांच्याकडे केली.

त्यांनी या मागणीला सकारात्मक पद्धतीने प्रतिसाद देत, जर एअर डेक्कन कंपनीने कोल्हापूर ते मुंबई विमानसेवा सुरळीतपणे चालू ठेवली नाही, तर त्यांचा करार रद्द केला जाईल. एअर इंडियाचा उपक्रम असलेल्या अलायंस एअरला कोल्हापूर ते मुंबई विमानसेवेचा ठेका दिला जाईल, असे राज्यमंत्री सिन्हा यांनी सांगितले असल्याची माहिती खासदार संभाजीराजे यांनी दिली.

अन्यथा कोल्हापूरसाठी दुसरा पर्यायअलायंस एअरच्या माध्यमातून एअर इंडिया मोठ्या शहरातून छोट्या शहरात विमानसेवा देते; त्यामुळे जर एअर डेक्कन कंपनीने विमानसेवा देण्यास चाल ढकल केली, तर दुसरा पर्याय अलायंस एअरच्या माध्यमातून कोल्हापूरसाठी उपलब्ध असणार असल्याची माहिती खासदार संभाजीराजे यांनी दिली. 

 

टॅग्स :airplaneविमानkolhapurकोल्हापूर