शिवरायांच्या मूर्ती विकणाऱ्यांचा संभाजी ब्रिगेडकडून सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:11 IST2021-02-20T05:11:53+5:302021-02-20T05:11:53+5:30

कोल्हापूर शहरातील विविध ठिकाणी रस्त्याकडेला बसून शिवरायांचे पुतळे बनविणाऱ्यांचा सन्मान करत संभाजी ब्रिगेडने अनोख्या पध्दतीने शुक्रवारी शिवजयंती ...

Sambhaji Brigade honors sellers of idols of Lord Shiva | शिवरायांच्या मूर्ती विकणाऱ्यांचा संभाजी ब्रिगेडकडून सन्मान

शिवरायांच्या मूर्ती विकणाऱ्यांचा संभाजी ब्रिगेडकडून सन्मान

कोल्हापूर शहरातील विविध ठिकाणी रस्त्याकडेला बसून शिवरायांचे पुतळे बनविणाऱ्यांचा सन्मान करत संभाजी ब्रिगेडने अनोख्या पध्दतीने शुक्रवारी शिवजयंती साजरी केली.

गेली अनेक वर्षे कोल्हापुरात अनेक कुटुंबे शिवजयंतीच्या सुमारास शिवपुतळे तयार करून विक्री करत असतात. अतिशय गरीब असणारे हे कलाकार अल्प किमतीमध्ये हे पुतळे उपलब्ध करून देतात. त्यामुळे छोटया मंडळांना, कार्यकर्त्यांना शिवजयंती साजरी करणेही सहजशक्य होते. याची दखल घेत संभाजी ब्रिगेडने हा अनुकरणीय उपक्रम राबवला.

शिवजयंती हा आमच्यासाठी सण आहे असे सांगत, या सर्व कलाकारांचा नवीन कपडे देऊन सत्कार करण्यात आला. पहिल्यांदाच अशा पध्दतीने सन्मान झाल्याने हे कलाकारही भारावून गेले.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रूपेश पाटील, मराठा सेवा संघाचे शहर कार्याध्यक्ष प्रशांत सासणे, ॲड. पृथ्वीराज राणे, ब्रिगेडचे शहराध्यक्ष अभिजित भोसले, नीलेश सुतार, शाहीर दिलीप सावंत, भगवान कोईगडे, अभिजित कांजर, सुजय देसाई, शर्वरी माणगावे, मदन परीट, बबलू ठोंबरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

१९०२२०२१ कोल संभाजी ब्रिगेड

शिवरायांचे पुतळे तयार करणाऱ्या कलाकारांचा संभाजी ब्रिगेडच्यावतीने शुक्रवारी सन्मान करण्यात आला.

Web Title: Sambhaji Brigade honors sellers of idols of Lord Shiva