शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी समरजित घाटगे बांधावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 18:20 IST2020-11-19T18:18:43+5:302020-11-19T18:20:50+5:30
farmar, BJP, Samarjit Singh Ghatge, kolhapur चोहोबाजूंनी संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे शुक्रवारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. सरकारने जाहीर केलेली मदत मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे वचनही त्यांनी शेतकऱ्यांना दिले. शाहू जनक घराणे जनपंचायतअंतर्गत शिवार संवाद दौऱ्याची सुरुवात करवीर तालुक्यातील चिंचवाड येथून झाली.

शाहू जनक घराणे जनपंचायतअंतर्गत शिवार संवाद दौऱ्याला गुरुवारी चिंचवाड, ता. करवीर येथून सुरुवात झाली. यावेळी समरजित घाटगे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.
कोल्हापूर : चोहोबाजूंनी संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे शुक्रवारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. सरकारने जाहीर केलेली मदत मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे वचनही त्यांनी शेतकऱ्यांना दिले. शाहू जनक घराणे जनपंचायतअंतर्गत शिवार संवाद दौऱ्याची सुरुवात करवीर तालुक्यातील चिंचवाड येथून झाली.
घाटगे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तीन आठवड्यांचा शाहू जनक घराणे जनपंचायत जिल्हा दौऱ्याची घोषणा केली आहे. पहिल्याच दौऱ्यात घाटगे यांनी शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांना मदतीविषयी आश्वस्त केले. शाहू महाराजांचे वंशज बांधावर येत असल्याने ग्रामीण जनतेमध्येही कुतुहल होते. स्वत: घाटगे यांनी शेतकऱ्यांना जवळ घेत त्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या. सजवलेली बैलगाडी स्वत: चालवत घाटगे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले.
घाटगे म्हणाले, शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे, शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीत प्रामाणिक कर्ज भरणाऱ्यांचे अनुदान थकले आहे. सरकारने दिलेला शब्द पाळावा, नुसत्या घोषणा करू नयेत. यावेळी किसान मोर्चाचे अध्यक्ष भगवान काटे, तुकाराम बोडके, रंगराव तोरसस्कर, संघर्ष कांबळे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या.