शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

इचलकरंजीच्या इंदिरा गांधी रुग्णालयातील ४२ कर्मचाऱ्यांना काम न करता वेतन, मनसेचे कोल्हापुरात आंदोलन

By संदीप आडनाईक | Updated: May 11, 2023 17:23 IST

२८ महिन्यांचे साडे सहा कोटी रुपयांचे वेतन नियमबाह्य अदा

कोल्हापूर : इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाकडील ४२ कर्मचाऱ्यांना काम न करता २८ महिन्यांचे साडे सहा कोटी रुपयांचे वेतन नियमबाह्य अदा केल्याबद्दल चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी कोल्हापुरातील आरोग्य उपसंचालक कार्यालयासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गुरुवारी आंदोलन केले.इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाकडील ४२ कर्मचाऱ्यांचे समावेशन सार्वजिनक आरोग्य विभागाच्या आदेशाने कायम करण्यात आले. त्यानुसार उपसंचालकरांनी ७ जानेवारी २०२२ रोजी या कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे आदेश दिले. त्यानुसार हे कर्मचारी १० जानेवारी २०२२ पासून प्रत्यक्ष कामावर हजर राहिले.

मात्र, या कर्मचाऱ्यांना आरोग्य विभागाचा कोणताही आदेश आणि पदस्थापना नसताना या कर्मचाऱ्यांना १ मे २०१९ ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत कोठेही हजर करुन घेतले नाही आणि त्यांनी कामही केले नाही. तरीही वैद्यकीय अधीक्षक, कार्यालयीन अधिकाऱ्यांनी आर्थिक संगनमत करुन त्यांना नियमबाह्यरित्या वेतन काढून शासनाची साडेसहा कोटींची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे. हे प्रकरण कार्यालयाकडून दडपण्याचा प्रयत्न होत असल्याबद्दल ६ एप्रिल रोजी कार्यालयासमोर उग्र आंदोलन केले होते. तरीही याची दखल न घेतल्याने गुरुवारी हे आंदोलन करण्यात आले. याप्रकरणी संबंधित अधिकारी, कर्मचारी यांची शासनस्तरावरुन चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मनसेच जिल्हा उपाध्यक्ष मोहन शेळके, राजू जाधव, संजय पाटील, विशाला माेरे, अमर बचाटे, तुषार चिकुर्डेकर, पन्हाळा तालुका उपाध्यक्ष नयन गायकवाड यांनी केली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMNSमनसेhospitalहॉस्पिटल