Kolhapur: बाळूमामांच्या वार्षिक भंडारा उत्सवास वीणापूजनाने सुरुवात, रविवारी जागर; कोणत्या दिवशी होणार भाकणूक...जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 12:01 IST2026-03-10T12:00:21+5:302026-03-10T12:01:24+5:30

यात्रेच्या पहिल्याच दिवशी नवरात्र उपवास करणारे भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी उपस्थित होते

Sadhguru Balumam's annual Bhandara festival begins in Adamapur kolhapur | Kolhapur: बाळूमामांच्या वार्षिक भंडारा उत्सवास वीणापूजनाने सुरुवात, रविवारी जागर; कोणत्या दिवशी होणार भाकणूक...जाणून घ्या

Kolhapur: बाळूमामांच्या वार्षिक भंडारा उत्सवास वीणापूजनाने सुरुवात, रविवारी जागर; कोणत्या दिवशी होणार भाकणूक...जाणून घ्या

वाघापूर : लाखो भाविकभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र आदमापूर (ता. भुदरगड )येथील सद्गुरू बाळूमामांच्या वार्षिक भंडारा उत्सवास अध्यक्ष धैर्यशील भोसले यांच्या हस्ते वीणापूजनाने प्रांरभ झाला.

समितीचे अध्यक्ष धैर्यशीलराजे भोसले यांच्या हस्ते समाधीपूजन, अभिषेक व विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर भंडारा यात्रेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी हरिभजन, धनगरी ढोल वादन, आदी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. बाळूमामांची आरती करण्यात आली तसेच फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसर, कळस तसेच भक्तनिवास येथे आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यात्रेच्या पहिल्याच दिवशी नवरात्र उपवास करणारे भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी उपस्थित होते.

यावेळी देवालय समितीचे कार्याध्यक्ष पुंडलिक होसमणी, सचिव रावसाहेब कोणकेरी, संदीप मगदूम, दत्तात्रय पाटील, दिनकरराव कांबळे, संभाजी पाटील, यशवंत पाटील, दिलीप पाटील, इंद्रजित खर्डेकर, रामणा मरेगुदरी, करणसिंह भोसले, बसवराज देसाई, विनायक शिंदे, तमाणा मासरेडी उपस्थित होते.

१५ मार्च रोजी जागर

बाळूमामा वार्षिक भंडारा उत्सव पहिला दिवस रविवार १५ मार्च रोजी जागर आहे. सोमवार, दि. १६ मार्च या दिवशी पहाटे चार वाजता कृष्णात डोणे महाराज (वाघापूर) यांची भाकणूक होईल व महाप्रसाद होईल. दहा वाजल्यापासून महाप्रसादास सुरुवात होईल. मंगळवार, दि. १७ मार्च रोजी सकाळी पालखी सोहळा तसेच गुढीपाडवा (दि. १९)पर्यंत यात्रा होईल.

Web Title : कोल्हापुर: बाळूमामा के वार्षिक भंडारा उत्सव की शुरुआत; 16 मार्च को भविष्यवाणी।

Web Summary : श्री बाळूमामा का वार्षिक भंडारा उत्सव वीणा पूजा के साथ शुरू हुआ। 15 मार्च को जागरण होगा, जिसके बाद 16 मार्च को कृष्णाट डोने महाराज द्वारा भविष्यवाणी की जाएगी। पालकी जुलूस 17 मार्च को होगा।

Web Title : Kolhapur: Balumama's annual Bhandara festival begins; prophecy on March 16.

Web Summary : The annual Bhandara festival of Shri Balumama began with Veena worship. A vigil will be held on March 15th, followed by the prophecy by Krishnaat Done Maharaj on March 16th. The palakhi procession will be on March 17th.