शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्ट महापालिका बरखास्त करा

By admin | Updated: June 24, 2015 00:42 IST

शिवसेना : दूषित पाण्याच्या बाटल्यांचे तोरण

कोल्हापूर : महापालिकेत भ्रष्टाचाराची अनेक उदाहरणे पुढे येत आहेत. शहरात पिण्याच्या पाण्यासह कचऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर आहे. शहरास पायाभूत सुविधा देण्यास कमी पडणारी ही महापालिका बरखास्त झालीच पाहिजे, अशी जोरदार मागणी शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी मंगळवारी महापालिकेवर मोर्चा काढून केली. दूषित पाण्याचे तोरण शिवसैनिकांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारास बांधले. आयुक्त पी. शिवशंकर यांना निवेदन देत क्षीरसागर यांनी शहराच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली.बिंदू चौकातून दुपारी साडेबारा वाजता या मोर्चास सुरुवात झाली. ‘भ्रष्ट महापालिका बरखास्त करा’ ‘शहराची हद्दवाढ झालीच पाहिजे’ अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या. यावेळी शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस, शिवाजी जाधव, सुनील जाधव, नगरसेविका स्मिता माळी, नगरसेवक महेश कदम आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शहरातील विविध प्रश्नांकडे शिवसेनेने वेळोवेळी पाठपुरावा करूनही महापालिका प्रशासन याबाबत गंभीर नाही. बोगस दाखल्यांच्या आधारेच बहुसंख्य काँगे्रेस-राष्ट्रवादीचे नगरसेवक निवडून आले आहेत. गेली ४० वर्षे शहराची हद्दवाढ न झाल्याने शहर गुदरमत आहे. रेड झोन क्षेत्रात भराव टाकून बांधकाम झाल्याने नागरी वस्तीत पुराचे पाणी येण्याचा धोका निर्माण झाला आहे. महापालिकेच्या शाळांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. मनपाच्या रुग्णालयात सुविधांची वानवा आहे. झोपडपट्टी व फेरीवाल्यांचा प्रश्न प्रलंबित आहे. असे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरलेली महापालिका बरखास्त करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे केली असल्याचे आमदार क्षीरसागर यांनी आयुक्तांना सांगितले. किमान नागरी सुविधा देण्यात अपयशी ठरल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. (प्रतिनिधी)