कोल्हापूर : महापालिकेच्या निवडणुकीत ८१ प्रभागात लढत झाली असली तरी साऱ्या जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या प्रभाग क्रमांक सातमध्ये शिंदेसेनेचे ऋतुराज राजेश क्षीरसागर विजयी झाले. त्यांनी सोशल मीडियावर विजयाची हवा तयार केलेल्या विजय साळोखे-सरदार यांचा पराभव केला. सोशल मिडीयावर तुम्ही हिरो असो, प्रत्यक्ष प्रभागात म्हणजेच तुमच्या गावांत तुमचे किती वर्चस्व आहे यावरच निवडणूक जिंकता येते याचेच प्रत्यंतर या विजयातून आले.या लढतीला दोन-तीन महत्त्वाचे पदर होते. आमदार राजेश क्षीरसागर यांचा मुलगाच थेट रिंगणात उतरला होता. त्यामुळे त्याबद्दल मतदारांत संमिश्र भावना होत्या. ओबीसीं मतदारांचा प्रभाव असलेला हा प्रभाग तिथे भाजपचेही कमिटेड मतदान आहे. लिंगायत, मुस्लीम-कुंभार बांधवांचे मतदान चांगल्या टक्क्यांत आहे. अठरापगड मतदार असलेला प्रभाग आहे. जुन्या धाटणीचा, शहराच्या गाभा म्हणता येईल अशा भागातील. ही जागा महाविकास आघाडीत उद्धवसेनेच्या वाट्याला गेली. त्यांनी रिक्षासेनेचे राजेंद्र जाधव यांना उमेदवारी दिल्यावर या जागेवर ऋतुराज यांना बाय दिल्याची चर्चा पहिल्याच दिवशी सुरू झाली.दोनवेळा नगरसेवक, स्थायी सभापती झालेल्या आणि जो विषय खटकतो त्यावर थेटपणे रिल्स करून सोशल मीडियावर सतत असणाऱ्या विजय साळोखे यांच्या उमेदवारीची चर्चा हळूहळू सुरू झाली. त्यांचे साधेपण, स्वच्छ चारित्र्य आणि रोखठोक स्वभाव लोकांना भावला. त्यातून ते लढतीच्या केंद्रस्थानी आले. त्यांची मोहिम प्रत्यक्ष प्रचारापेक्षा सोशल मीडियावर जास्त होती. त्यावर जगभरातून त्यांना पाठिंबा मिळत होता. त्यामुळे विजयी कोण होते याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. क्षीरसागर यांचे या प्रभागातील वर्चस्व, महायुतीची ताकद ऋतुराज यांच्या बाजूला होती. ती ऋतुराज यांच्या विजयासाठी कारणीभूत ठरली. त्यांना विजयाचा आत्मविश्वास होता कारण मतमोजणी सुरु होण्यापूर्वीच क्षीरसागर समर्थकांनी दसरा चौकात ऋतुराज यांच्या विजयाचा फलक लावला होता.
Web Summary : Rituraj Kshirsagar of Shinde Sena won Kolhapur Municipal election from Ward 7, defeating Vijay Salokhe. Kshirsagar's local dominance and Mahayuti support proved decisive, overcoming Salokhe's strong social media presence. The election was closely watched due to family ties and diverse voter base.
Web Summary : शिंदे सेना के ऋतुराज क्षीरसागर ने कोल्हापुर नगर निगम चुनाव वार्ड 7 से जीता, विजय सालोखे को हराया। क्षीरसागर का स्थानीय प्रभुत्व और महायुति का समर्थन निर्णायक साबित हुआ, सालोखे की मजबूत सोशल मीडिया उपस्थिति पर काबू पाया। पारिवारिक संबंधों और विविध मतदाता आधार के कारण चुनाव पर कड़ी नजर रखी गई।