Kolhapur: भरधाव मालवाहतूक ट्रकची कारला पाठीमागून धडक, चालकाचा ताबा सुटून ट्रक सेवामार्गावर कोसळला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 12:53 IST2024-12-05T12:50:55+5:302024-12-05T12:53:27+5:30

सतिश पाटील शिरोली : कारला पाठीमागून धडक देत भरधाव मालवाहतूक ट्रक चालकाचा ताबा सुटून ट्रक महामार्गावरुन २५ फूट खाली सेवा ...

Rushing cargo truck hits car from behind driver loses control truck falls on service road in Kolhapur | Kolhapur: भरधाव मालवाहतूक ट्रकची कारला पाठीमागून धडक, चालकाचा ताबा सुटून ट्रक सेवामार्गावर कोसळला 

Kolhapur: भरधाव मालवाहतूक ट्रकची कारला पाठीमागून धडक, चालकाचा ताबा सुटून ट्रक सेवामार्गावर कोसळला 

सतिश पाटील

शिरोली : कारला पाठीमागून धडक देत भरधाव मालवाहतूक ट्रक चालकाचा ताबा सुटून ट्रक महामार्गावरुन २५ फूट खाली सेवा मार्गावर कोसळला. शिरोली एमआयडीसी फाटा येथे आज, गुरुवारी सकाळी ११.३० वाजता हा अपघात झाला.

अधिक माहिती अशी की, पुण्याहून बंगळूरला मालवाहतूक ट्रक निघाला होता. दरम्यान, समोरील कारला मालवाहतूक ट्रकने पाठीमागून धडक दिली. यावेळी चालकाला गाडीचा वेग आवरला नाही अन् गाडीवरचा ताबा सुटून ट्रक लोखंडी बॅरेकेटला धडकून महामार्गावरून २५ फूट खाली सेवा मार्गावर कोसळला. नेहमी सकाळी सेवा मार्गावर वर्दळ असते. आज वर्दळ नसल्याने मोठा अनर्थ टळला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. 

Web Title: Rushing cargo truck hits car from behind driver loses control truck falls on service road in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.