शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: बालकल्याण संकुलातील ‘रुक्मिणी’ झळकणार राज्यभर; ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाच्या प्रसिद्धी मोहिमेत चित्र काढण्याची मिळाली संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 16:43 IST

मंत्री आदिती तटकरे यांनी केले कौतुक 

कोल्हापूर : कला ही कुणाची मक्तेदारी नसते तर ती आपसूक फुलत जाणारी गोष्ट आहे. या कलेमुळे ‘बालकल्याण संकुल’मध्ये राहत असलेल्या रुक्मिणी मंजुनाथ राठोड या १८ वर्षांच्या मुलीला ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाच्या राज्यभर राबवल्या जाणाऱ्या प्रसिद्धी मोहिमेत चित्र काढण्याची संधी मिळाली आहे. कलानिकेतनमध्ये चित्रकलेतील ॲडव्हान्सच्या वर्गात शिकत असलेल्या ‘रुक्मिणी’ची चित्रे पाहून महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी गुरुवारी तसे आदेश दिले.दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या मंत्री आदिती तटकरे यांनी गुरुवारी मंगळवार पेठेतील बालकल्याण संकुलास भेट दिली. संस्थेतील प्रत्येक विभागाची माहिती घेतल्यानंतर त्या आर्ट अँड ॲक्टिव्हिटी विभागात आल्या इथे रुक्मिणीसह संस्थेतील मुलींनी केलेल्या फॅशन डिझायनिंग, क्लॉथ पेंटिंग, शोभेच्या वस्तू व अन्य कलाकृती त्या पाहत होत्या. त्याचवेळी त्यांनी रुक्मिणीने काढलेली सुंदर चित्रे पाहिली.तिच्या कलेचे कौतुक करत तिथेच त्यांनी बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानाची प्रसिद्धी मोहिमेत तिला सहभाग करून घ्या, तिला संकल्पना सांगा व तिच्याकडून चित्र काढून घेऊन तेच मोहिमेमध्ये वापरा, असे आदेशच त्यांनी दिले. रुक्मिणीने मंत्री तटकरे यांचे उत्तम स्केच तयार केले होते. संस्थेने त्यांचा सत्कार करताना त्यांना एक भेट वस्तू दिली. त्यांनी ती तिथेच उघडून पाहिली आणि त्या थक्कच झाल्या. कारण, त्यांचे रुक्मिणीने पेन्सीलने काढलेले त्यांचे ते हुबेहूब चित्र होते. तिथेच मंत्री तटकरे यांनी तिला बाेलवून घेऊन तिचा सत्कार केला.रुक्मिणीच्या आनंदाला पारावार राहिला नाहीमूळच्या कर्नाटकातील आई-वडिलांचे निधन झाल्यानंतर मायेला पोरक्या झालेल्या रुक्मिणीसह तिच्या दोन बहिणी व भाऊ, अशी चार भावंडं २०१८ मध्ये बालकल्याण संकुलमध्ये दाखल झाली. संस्थेत राहूनच मोठी बहीण पदवीधर झाली. लहान बहीण बारावीत आणि भाऊ अकरावीला आहे. आपल्या कलेचे कौतुक झाले आणि मिळालेली संधी पाहून रुक्मिणीच्या आनंदाला पारावार राहिला नाही. अशा अनेक रुक्मिणी बालकल्याण संकुल घडवत आहे, हे या संस्थेचे राज्यातील वेगळेपण आहे आणि ते पाहून मी भारावून गेले, अशी प्रतिक्रिया मंत्री तटकरे यांनी यावेळी व्यक्त केली.