शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

बटकणंगलेच्या पाझर तलावाला ४४ लाखाचा निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 5:26 PM

water scarcity Kolhapur- बटकणंगले (ता. गडहिंग्लज) येथे नवीन पाझर तलाव बांधण्यासाठी मृद व जलसंधारण विभागाकडून ४४ लाखाचा निधी मंजूर झाला. त्याची निविदादेखील निघाली असून या तलावामुळे गावचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

ठळक मुद्देबटकणंगलेच्या पाझर तलावाला ४४ लाखाचा निधी मंजूरनिविदाही निघाली : गावचा पाणीप्रश्न सुटण्यास होणार मदत

गडहिंग्लज : बटकणंगले (ता. गडहिंग्लज) येथे नवीन पाझर तलाव बांधण्यासाठी मृद व जलसंधारण विभागाकडून ४४ लाखाचा निधी मंजूर झाला. त्याची निविदादेखील निघाली असून या तलावामुळे गावचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.मे २०१८ मध्ये कांही तरूण कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे स्थानिक जल फौंडेशनच्या माध्यमातून गावापासून २ किलोमीटर अंतरावर असलेल्या भैरीच्या डोंगरावरून पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी जिरवण्यासाठी श्रमदानातून चरखुदाई केली होती. त्यानंतर २०१९ मध्ये नाम फौंडेशननेदेखील यासाठी मदत केली. त्यामुळे लोकसहभागातून सुमारे २५ लाखाचे काम झाले.दरम्यान, पाण्यासाठी धडपडणारे गाव म्हणून शासनाने जलयुक्त शिवार योजनेत बटकणंगलेचा समावेश केला. त्यातूनच हा तलाव बांधण्याचा प्रस्ताव पुढे आला. गावालगतच्या तारओहळला पुरेसे पाणी नसल्यामुळे व गावाजवळून कोणतीही नदी वाहत नसल्यामुळे दरवर्षी गावकऱ्यांना तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत होते. त्यामुळे जिल्हा परिषदेने एकमताने त्याला मान्यता दिली. जलसंधारण विभागातर्फे काढण्यात आलेली ही निविदा १ एप्रिल रोजी उघडण्यात येणार आहे. याकामी आमदार राजेश पाटील, जि. प. उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.

 गोठणावर होणार तलावबटकणंगले येथील गोठण नावाच्या गायरानातील सुमारे अडीच एकर जागेवर हा तलाव बांधण्यात येणार आहे. गावालगतच्या भैरीच्या डोंगरावरून पावसाळ्यात वाहून वाया जाणारे पाणी या तलावामध्ये साठविण्यात येणार आहे. त्यामुळे गावातील गुरा-ढोरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय होणार असून आजूबाजूच्या शेतकऱ्यांनाही त्याचा लाभ होणार आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईkolhapurकोल्हापूर