शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
2
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
3
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
4
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
5
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
6
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
7
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
8
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
9
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
10
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
11
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
12
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
13
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
14
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
15
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
16
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
17
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
18
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
19
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
20
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

‘आशां’चे तीन कोटी रुपये तालुक्यांना वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:20 IST

कोल्हापूर : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी तराटणी दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ‘आशा’ आणि गटप्रवर्तकांच्या मानधनाचे ...

कोल्हापूर : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी तराटणी दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ‘आशा’ आणि गटप्रवर्तकांच्या मानधनाचे तीन कोटी रुपये दुसऱ्याच दिवशी, मंगळवारी तालुक्यांना वर्ग करण्यात आले आहेत.

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ योजनेतील आणि वाढीव मानधनाची रक्कम मिळावी यासाठी ‘आशां’नी जिल्हा परिषदेसमोर सात तास रास्ता रोको केला होता. याबाबत मुश्रीफ यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांना शासकीय विश्रामगृहावर बोलावून ‘कारणे सांगू नका, मानधन देऊन टाका,’ अशा स्पष्ट सूचना केल्या होत्या.

त्यानुसार ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ पहिल्या टप्प्यातील ३०८५ ‘आशां’चे ३८ लाख ८२ हजार मानधन मंगळवारी तालुक्याला पाठविण्यात आले आहे. तसेच कोरोनाच्या काळामध्ये गटप्रवर्तक यांना तीन हजार आणि ‘आशां’ना दोन हजार वाढीव मानधनाची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्याचे दोन कोटी ३९ लाख ४४ हजार रुपयेही तालुक्याला वर्ग करण्यात आले आहेत. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या चार महिन्यांचे हे वाढीव मानधन आहे.

इचलकरंजी नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ११० आशांचे आठ लाख ४८ हजार रुपयेही वितरित करण्यात आले आहेत. कोल्हापूर महापालिकेकडे २०५ आशा कार्यरत असून त्यांच्या मानधनाची १४ लाख ४० हजार रुपयांची रकमेची फाईल अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात आले. तालुका आरोग्याधिकाऱ्यांकडे ही रक्कम वर्ग करण्यात आली असून, ती दोन दिवसांत संबंधितांच्या खात्यावर जमा होणार आहे.