शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

‘रोल मॉडेल’ मलकापुरात अतिसाराची साथ

By admin | Updated: July 18, 2015 00:13 IST

अडीचशे रुग्ण : पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले

मलकापूर : जलशुद्धीकरण प्रकल्प व चोवीस तास पाणीपुरवठा योजनेसाठी राष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या मलकापूर शहरात अतिसाराची लागण झाली आहे. दूषित पाण्यामुळे ही साथ पसरल्याची दाट शक्यता असून, शहरातील विविध खासगी रुग्णालयांमध्ये सुमारे अडीचशे रुग्णांवर उपचार केले जात आहेत. दरम्यान, नगरपंचायत प्रशासनाने तातडीने ३९ ठिकाणचे पाणी नमुने तपासणीसाठी संकलित केले आहेत. शुक्रवारी दुपारी हे नमुने सातारा येथे पाठविले आहेत. पाणी शुद्धीकरणाच्या दृष्टीने उपाययोजना आखल्या जात असल्याचे प्रशासनाने सांगितले. शहरातील कोयना वसाहत व आगाशिवनगर भागात ही साथ पसरली असून,इतर भागातही साथ पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. आगाशिवनगर व कोयना वसाहत या भागातील सुमारे अडीचशे जणांना गुरुवारपासून जुलाब व उलट्यांचा त्रास सुरू झाला. सुरुवातीला नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, त्रास वाढतच असल्याने अखेर नागरिकांनी रुग्णालयाचा रस्ता धरला. शहरात सुमारे पंधरा खासगी रुग्णालये आहेत. या रुग्णालयांमध्ये गुरुवार व शुक्रवार या दोन दिवसांत अतिसाराचे सुमारे अडीचशे रुग्ण दाखल झाले. त्यांच्यावर तातडीने उपचारही करण्यात आले आहेत. शहरात अतिसाराची लागण झाल्याने नगरपंचायत प्रशासनही हबकले आहे. नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा व आरोग्य विभागाने शहरातील ३९ ठिकाणचे पाणी नमुने तपासले. (प्रतिनिधी)काले प्राथमिक आरोग्य केंद्राचेडॉ. किशोर काळे, डॉ. नितीन अष्टवणे यांच्यासमक्ष पाणी तपासून क्लोरीनचा डोस कमी केलेला आहे. नागरिकांनी दोन दिवस पाणी उकळून व गाळून प्यावे. - राजेंद्र तेली, मुख्याधिकारीपावसाळ्याचा विचार करून क्लोरीन गॅसचा डोस वाढविला होता. मात्र, पाऊस बंद झाल्यानंतर क्लोरीनचा डोस कमी करणे गरजेचे होते. तो तसाच राहिल्यामुळे नागरिकांना पोटदुखी व जुलाबाचा त्रास होत आहे. पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. - यू. पी. बागडेजलअभियंता, पाणीपुरवठा विभाग