शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

घरची परिस्थिती हलाखीची; १८ व्या प्रयत्नात सैन्यदलात निवड झाली, कोल्हापुरात जिगरी दोस्तानं खांद्यावर घेऊन मिरवणूक काढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 15:30 IST

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

दुर्वा दळवीकोल्हापूर: प्रत्येकाच्या आयुष्यात एक असा जिवलग मित्र असतो. जो आपल्या पडत्या काळात आणि आनंदाच्या वेळेला नेहमीच मित्राला साथ देतो. असाच एक मित्र कोल्हापूरसह राज्यात नाहीतर देशात चर्चेत आला आहे. भारतीय सैन्यदलात रोहित राजू जोंधळे याची निवड झाल्याची माहिती मिळताच त्याचा जिवलग मित्र संतोष यांने गुलाल उधळून जल्लोष करत खांद्यावर घेऊन सगळीकडे मिरवणूक काढली. या मिरवणुकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.एखाद्या स्वप्नाच्या मागे धावताना कितीही अपयश आलं तरी आपण थांबायचं नसतं आणि आपल्या मित्राला त्याच्या पडत्या काळात नेहमीच साथ द्यायची असते. अशीच एक कोल्हापुरात कहाणी घडली. कोल्हापूरच्या कावळा नाका परिसरात राहणाऱ्या रोहित राजू जोंधळे याची भारतीय सैन्यदलात निवड झाली आहे. रोहित यांची घरची परिस्थिती तशी बेताचीच. सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या रोहित यांचे एक स्वप्न होते. तर रोहित यांचे जीवलग मित्र संतोष माने यांनीही ते स्वप्न पाहिलेले. परंतु परिस्थितीमुळे संतोष यांनी वेगळी वाट निवडली. पण रोहित यांनी सैन्यात भरती व्हावं यासाठी संतोष यांनी नेहमीच सहकार्य केले. १७ वेळा पदरी निराशा तब्बल १७ वेळा भरतीसाठी रोहित यांनी प्रयत्न केले पण दरवेळी निराशाच नशिबी आली. आता शेवटची संधी त्यांच्याकडे होती. याचवेळी रोहित यांचे मित्र संतोष यांनी मित्राला सांगितले यावेळी जर तू यशस्वी झालास तर भावा मी खांद्यावर घेऊन तुझी गावभर मिरवणूक काढीन.  आणि मग रोहित यांनी मित्राचा शब्द खरा ठरवला. संतोष यांना रोहित सैन्यात भरती झाल्याची माहिती मिळताच त्यांनी गुलाल उधळून जल्लोष करत खांद्यावर घेऊन सगळीकडे मिरवणूक काढली. या दोघांची मैत्री आणि देशभक्ती संगम पहायला मिळाला. नेटकऱ्यांना भावली मैत्रीरोहित जोंधळे सैन्यात भरती झाल्याची माहिती मिळताच जीवलग मित्र संतोष यांनी रोहितला खांद्यावर घेत मिरवणूक काढली. 'भारत माता की जय च्या जयघोषात त्यांनी काढलेली ही मिरवणूक नेटकऱ्यांना खूपच भावली. त्यामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून त्याची चर्चा ही होत आहे. रोहित आणि संतोष यांनी मात्र आपली मैत्री आणि देशभक्ती या व्हिडिओच्या माध्यमातून देशभर पोहोचवली. इतकेच नाही. तर सोबत हा संदेश देखील दिला. जर एखादं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे असेल तर त्यासाठी जिद्द आणि चिकाटी तुमच्याजवळ असेल. तर ते स्वप्न एक ना एक दिवस रोहित यांच्यासारखे पूर्ण होतेच होते. निवडीच्या दिवशीच रोहितची आई होती आयसीयूमध्ये ज्या दिवशी त्याची निवड झाली त्यादिवशी त्याची आई आयसीयूमध्ये होती. एका बाजूला दुख: आणि दुसऱ्या बाजूला आनंद होता. अशा परिस्थितीत रोहितने खूप संघर्ष अनुभवला आहे. आम्हा दोघांचे भरती होण्याचे स्वप्न होते. मात्र काही कारणास्तव मी वेगळा मार्ग निवडला. मात्र माझ्या मित्राने भरती होवून ते पुर्ण केल्याने मला आनंद असल्याचे रोहित यांचे मित्र संतोष माने याने सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur friend celebrates army selection after 18 attempts with parade.

Web Summary : After 17 rejections, Rohit Jondhale's army selection sparked a jubilant parade by his friend Santosh in Kolhapur. Overjoyed Santosh carried Rohit on his shoulders, celebrating his friend's perseverance and achievement.