शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

‘कुंभी-कासारी’त रोडरोमिओंचा उच्छाद

By admin | Updated: December 17, 2014 23:09 IST

दररोजचाच धिंगाणा : प्रेमवीरास जाब विचारणाऱ्या नातेवाइकांना मारहाण

कोपार्डे : कुंभी-कासारी कारखाना परिसरात शिक्षणासाठी येणाऱ्या मुलांच्या छेडछाडीबाबत जाब विचारणाऱ्या नातेवाइकांना छेडछाड करणारा युवक व त्याच्या मित्रांकरवी बेदम मारहाण करण्यात आली. याबाबत कॉलेज प्रशासन असह्य, तर करवीर पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष यामुळे ‘रोडरोमिओं’ना बळ आले आहे. रोडरोमिओंना कोण आळा घालणार, असा प्रश्न पालक व शाळा व्यवस्थापन यांना पडला आहे.कुंभी-कासारी कारखान्यावर दोन कनिष्ठ महाविद्यालय, एक वरिष्ठ महाविद्यालय, चार माध्यमिक शाळा, दोन वस्तीशाळा, एक औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, तर चार संगणक प्रशिक्षण देणाऱ्या संस्था आहेत. या शैक्षणिक संस्थांमध्ये करवीर, पन्हाळा, राधानगरी, गगनबावडा व शाहूवाडी या पाच तालुक्यांतील ग्रामीण भागातील विद्यार्थी येतात. त्यामध्ये मुलींची संख्या मोठी आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून येथे रोडरोमिओंनी उच्छाद मांडला असून, परिसर मुलींसाठी असुरक्षित बनत चालला आहे.सकाळी सहा ते साडेसात दरम्यान शाळा-कॉलेजसाठी मुली सांगरूळ फाटा (कोपार्डे) येथे एस.टी.ने येतात. तेथून त्या शिक्षणसंस्थांत अर्धा किलोमीटर चालत येतात. या रस्त्यादरम्यान मुलींची छेडछाड करणे मुलींच्या आडवी गाडी मारणे, असे प्रकार सर्रास सुरू झाल्याने मुली, पालक व शिक्षकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.येथील एका महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलीने रोडरोमिओंविरोधात नातेवाइकांकडे तक्रार केल्यानंतर आज त्याला जाब विचारला. यावेळी शाळेत दंगा सुरू झाला. येथील कर्मचाऱ्यांनी तो वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. तरीही शाळेच्या बाहेर गेल्यानंतर या रोडरोमिओने आपल्या मित्रांना बोलावून घेत नातेवाइकांनाच बेदम मारहाण केली आहे. (वार्ताहर)असे प्रकार घडू नयेत यासाठी करवीर पोलिसांकडून समुपदेशन कार्यक्रम घेतले. मुलांना कायदा काय आहे याबाबत माहिती दिली; पण शाळाबाह्य मुले असा प्रकार करतात. तोही रस्त्यावर. त्यामुळे आम्हालाही मर्यादा येत आहेत.- एम. के. आळवेकर, प्राचार्य, श्रीराम ज्युनिअर कॉलेज.आता कायद्याचा धाक हाच एक उपाय आहे. आम्ही सर्व पातळीवर येथे त्रास देणाऱ्या मुलांचे प्रबोधन केले. आता पालक, मुली यांनी सजगता बाळगून अशा ‘रोडरोमिओंना धडा शिकविला पाहिजे.- बी. एल. पाटील, उपप्राचार्य.