सीसीटीव्ही फुटेजमध्ये लुटारू कैद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2021 11:06 IST2021-02-04T11:04:46+5:302021-02-04T11:06:46+5:30

Crimenews Cctv Police Kolhpaur- देवीचा जागर (आराधी) करण्यासाठी कोल्हापुरात बोलविलेल्या लातूर जिल्ह्यातील राचन्नावाडी (ता. चाकूर) येथील कलाकारांना जेवणातून गुंगीचे औषध देऊन लुटण्याचा प्रकार घडला.लुटारूची हालचाल यात्री निवासमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, हे फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Robber captures in CC footage | सीसीटीव्ही फुटेजमध्ये लुटारू कैद

सीसीटीव्ही फुटेजमध्ये लुटारू कैद

ठळक मुद्देसीसी फुटेजमध्ये लुटारू कैदफुटेज पोलिसांनी घेतले ताब्यात

कोल्हापूर : देवीचा जागर (आराधी) करण्यासाठी कोल्हापुरात बोलविलेल्या लातूर जिल्ह्यातील राचन्नावाडी (ता. चाकूर) येथील कलाकारांना जेवणातून गुंगीचे औषध देऊन लुटण्याचा प्रकार घडला.लुटारूची हालचाल यात्रीनिवासमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, हे फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

बेशुद्ध होऊन निपचीत पडलेल्या महिला व पुरुषांच्या अंगावरील लाखो रुपये किमतीचे दागिने व रोकड घेऊन लुटारूने पोबारा केला.  संबंधित लुटारू हा ४० वर्ष वयोगटातील असून, त्याने मंगळवारी सायंकाळीच यात्री निवासमध्ये रूम बुक करण्याबाबत चौकशी केली होती. त्यानंतर रात्री १२ वाजता तो सर्वांना घेऊन आला. त्याने सखुबाई सूर्यवंशी नावाने रूम ताब्यात घेतली, त्यांचे आधारकार्डही ठेवून घेतले.

लुटारूने आपला डाव आटोपता घेऊन पहाटे दाराला बाहेरून कुलूप लावून पोबारा केला. लुटारूची हालचाल यात्री निवासमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, हे फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Web Title: Robber captures in CC footage