शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

हातगाड्यांमुळे वाहतुकीची कोंडी

By admin | Updated: December 2, 2014 00:20 IST

इचलकरंजीत रहदारीस अडचण : पादचारी हैराण; मांसाहारी गाड्यांमुळे महिला वर्ग त्रस्त

राजाराम पाटील - इचलकरंजी  शहरातील मुख्य रस्ते आणि प्रमुख चौकांत हातगाड्यांची दिवसेंदिवस वाढत जाणारी संख्या आणि रहदारीच्या अडचणींबरोबर बोकाळलेली बेशिस्त, यामुळे नागरिक अक्षरश: हैराण झाले आहेत. विशेषत: मांसाहारी खाद्यपदार्थ विक्रीच्या गाड्यांभोवती राजरोस चालणाऱ्या मद्यप्राशन करण्याच्या प्रवृत्तीमुळे महिला वर्ग त्रस्त झाला आहे.शहरात करवीर नाका ते गांधी पुतळा-राजवाडा चौक मार्गे नदीवेस नाका, नदीवेस नाका-चांदणी चौक-संभाजी चौक मार्गे स्टेशन रोड, राजवाडा चौक-जुना सांगली नाका ते जय सांगली नाका असे मुख्य रस्ते आहेत, तर या रस्त्यावरील चौकांबरोबर तीन बत्ती चार रस्ता, औद्योगिक वसाहतीतील जुने बस स्टॅण्ड, थोरात चौक, विक्रमनगरमधील चौक आणि शहापूर गावातील चौक अशा विविध चौकांत अलीकडील वर्षा-दोन वर्षांत विविध प्रकारचे फळफळावळ, खाद्यपदार्थ, बेकरी माल विक्रीबरोबरच ‘चिकन ६५’ विक्रीच्या हातगाड्यांच्या संख्या वाढली आहे.साधारणत: सात-आठ वर्षांपूर्वी नगरपालिकेकडे सुमारे २०० हातगाड्यांची नोंद होती. मात्र, अलीकडील काळात नगरपालिकेने या हातगाड्यांची कोणतीही नोंद ठेवली नाही. परिणामी कोणतेही बंधन नसल्याने हातगाड्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. एका अनधिकृत सर्वेक्षणानुसार इचलकरंजीतील हातगाड्यांची संख्या दोन हजारांहून अधिक असल्याचे सांगितले जाते. या हातगाड्यांनी आता तर हायस्कूल, महाविद्यालयांबरोबरच प्राथमिक शाळांच्या लगतच्या रस्त्यावर आपले हात-पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. शाळेलगतच्या गाड्यांवर अत्यंत हलक्या दर्जाच्या चॉकलेट व गोळ्या आणि खाद्यपदार्थ विक्रीस ठेवण्यात आल्याने त्याचा लहान मुलांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ किंवा शितपेये विक्रीबाबत अन्न व भेसळ प्रतिबंधक खात्याचा परवाना आवश्यक आहे. तसेच त्यावर पालिकेचीही परवाना पद्धतीचे बंधन पाहिजे; मात्र फक्त साथीच्यावेळी जाग्या होणाऱ्या या दोन्ही खात्यांनी हातगाड्यांवर बंधन ठेवण्याची गरज आहे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.चौकांनाच अतिक्रमणांचा गराडाशहरातील वाहतूक मुख्य वाहिन्या असलेल्या प्रमुख रस्त्यांवरील शाहू पुतळा चौक, शिवाजी पुतळा चौक, डेक्कन मिल चौक, तीन बत्ती चौक, नदीवेस मरगुबाई मंदिर, जय सांगली नाका याठिकाणी हातगाड्यांचा गराडा वाहतुकीस धोकादायक ठरत आहे. नगरपालिका अतिक्रमण निर्मूलन विभाग व वाहतूक नियंत्रण पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करीत हातगाड्या हटवाव्यात म्हणजे त्याठिकाणची वाहतूक सुलभ होईल, अशी अपेक्षा वाहनधारक व नागरिकांतून होत आहे.फेरीवाल्याचीच धमकीफेरीवाल्याच्या गाड्यांसाठी बाजार करात केलेली वाढ रद्द करावी, या मागणीसाठी डेक्कन स्पिनिंग परिसरातील एक शिष्टमंडळ अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांना भेटण्यासाठी आले होते. त्यावेळी चर्चेत एका गाडीवाल्याने वाढलेला कर देतच नाही आणि गाडीला पण हात लावू देणार नाही, अशी धमकी दिल्यामुळे तेथे तणाव निर्माण झाला होता.‘चिकन ६५’चा त्रासशहरात विविध ठिकाणी असलेल्या चिकन ६५ च्या हातगाड्या सायंकाळी सुरू होतात. त्याठिकाणी सातत्याने दहा-बारा कुत्र्यांचा वावर असतो. तसेच रात्रीच्या अंधारात अशा काही गाड्यांवर मद्यपींची गर्दी असते. परिणामी त्याचा त्रास विशेषत: महिलांना अधिक होतो.हातगाड्यांची हॉटेलवर संक्रांत४हातगाड्यांना कोणताही परवाना नाही किंवा कराची आकारणी होत नाही. तसेच फर्निचर, सजावटीचा खर्च होत नाही. ४त्याचबरोबर कामगार, वीज बिल, जागा भाडे, स्वच्छता, साफसफाई अशा हॉटेलवाल्यांप्रमाणे कसलाही खर्च येत नसल्याने आणि हॉटेलपेक्षा स्वस्त दरात पदार्थ मिळत असल्याने इचलकरंजीत हातगाड्यांची चलती आहे, तर उपाहारगृहे, हॉटेल मात्र ओस पडली आहेत.