किरकोळ वादातून डोक्यात घातली सळी, फुलेवाडीतील प्रकार : एकावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 18:19 IST2019-09-23T18:18:48+5:302019-09-23T18:19:53+5:30

हळदकर घाणाशेजारी सिल्वर तरुण मंडळ फुलेवाडी चौथा बसस्टॉप येथील घरासमोर खडी पसरत असताना झालेल्या वादातून लोखंडी सळी डोक्यात घातल्याने गणेश जनार्दन सावंत (वय ४०) हे गंभीर जखमी झाले.

Rinse, florist in the head with minor arguments: crime against one | किरकोळ वादातून डोक्यात घातली सळी, फुलेवाडीतील प्रकार : एकावर गुन्हा

किरकोळ वादातून डोक्यात घातली सळी, फुलेवाडीतील प्रकार : एकावर गुन्हा

ठळक मुद्देकिरकोळ वादातून डोक्यात घातली सळी फुलेवाडीतील प्रकार : एकावर गुन्हा

कोल्हापूर : हळदकर घाणाशेजारी सिल्वर तरुण मंडळ फुलेवाडी चौथा बसस्टॉप येथील घरासमोर खडी पसरत असताना झालेल्या वादातून लोखंडी सळी डोक्यात घातल्याने गणेश जनार्दन सावंत (वय ४०) हे गंभीर जखमी झाले.

त्यांच्यावर ‘सीपीआर’मध्ये उपचार करण्यात आले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जुना राजवाडा पोलिसांनी संशयित राजू बाबूराव मांगलेकर (रा. फुलेवाडी) याच्यावर गुन्हा दाखल केला. रविवारी दुपारी ही घटना घडली.

पोलिसांनी सांगितले, गणेश सावंत हे आपल्या घरासमोर खडी पसरवीत होते. यावेळी संशयित राजू मांगलेकर त्याच्या दारात उभा होता. सावंत यांना पाहून त्याने खडी पसरतोस काय, अशी विचारणा केली. त्यावर त्यांनी खडी पसरतो आहे, तुझ्या दारात नाही असे म्हटल्यानंतर त्याने माझं, तुझं काय करू नकोस, असे म्हणून दारात पडलेली लोखंडी सळी घेऊन डोक्यात घातली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव तपास करीत आहेत.
 

 

Web Title: Rinse, florist in the head with minor arguments: crime against one