संदीप आडनाईककोल्हापूर : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याचा समावेश असलेल्या चांदोली राष्ट्रीय उद्यान म्हणजे जैवविविधतेची श्रीमंती आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा भाग असलेल्या या अभयारण्यात लोकमतच्या टीमला वाघासह गरुड, गवे, सांबरे, महाराष्ट्राचा मानबिंदू शेखरू, हरियाल पक्षी, भेकर, रानडुक्कर, घुबड, सिव्हेट कॅट असे विविध वन्यजीव निर्धास्त भ्रमंती करताना आढळले.सांगली जिल्ह्यातील वारणा नदीवरील चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांदोली अभयारण्य आहे. २००४ मध्ये याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाला. चांदोली धरणाच्या तलावात नावेतूनही जंगल फिरता येते. ३१७.६७ किलोमीटर क्षेत्र असलेल्या या अभयारण्याला मार्च २००७ मध्ये राष्ट्रीय उद्यान म्हणून अधिकृत घोषित करण्यात आले आहे. चांदोली जलाशयाचा विस्तीर्ण आणि विहंगम परिसर दुर्गवाडीच्या डोंगरावरून दिसतो. वारणा नदीचा उगम येथेच होतो. १७ व्या शतकातील प्रचितगड, भैरवगड हे किल्ले ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे आहेत.
वाचा: थरारक... 'लोकमत'च्या कॅमेऱ्यात चंदाची भेदक नजरचांदोली राष्ट्रीय उद्यानात ६ वाघांसह बिबट्या, अस्वले, अजगर, सरपटणारे विविध प्राणी, पक्षी, मोठ्या प्रमाणावर आहेत. राज्याचे मानबिंदू असणारे शेकरू तसेच हरियाल पक्षी यांचे अस्तित्वही येथे आहे. हे राज्यातले सर्वांत मोठे अभयारण्य आहे. सदाहरित हिरवे गर्द जंगल म्हणून हे राष्ट्रीय उद्यान पर्यटकांना आकर्षित करते. या संपूर्ण अभयारण्याची १२ खंडांत विभागणी केली आहे. वनविभागाने या क्षेत्राचे कोअर आणि बफर असे विभाग केलेले आहेत. प्राण्यांचे पाणवठे, पायवाटांवरील पायांचे ठसे, झाडांवरील ओरखडे, विष्ठा यांची तपासणी हे येथील कर्मचाऱ्यांचे नियमित काम आहे.
Web Summary : Chandoli National Park, a part of the Sahyadri Tiger Reserve, teems with diverse wildlife including tigers, gaurs, sambar deer, and the Indian giant squirrel. The park, with its lush greenery and historic forts, attracts tourists and is divided into core and buffer zones for effective wildlife management.
Web Summary : चांदोली राष्ट्रीय उद्यान, सह्याद्री व्याघ्र परियोजना का हिस्सा, बाघों, गौर, सांभर और विशाल गिलहरी सहित विविध वन्यजीवों से समृद्ध है। हरी-भरी हरियाली और ऐतिहासिक किले पर्यटकों को आकर्षित करते हैं। प्रभावी वन्यजीव प्रबंधन के लिए पार्क को कोर और बफर जोन में विभाजित किया गया है।