शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील आजऱ्यात होणार यंत्राद्वारे भातरोप लागण, शेतकऱ्यांना दिले जाणार प्रशिक्षण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 18:32 IST

शेतकरी विकास मंडळाने दिली मशिनरीची ऑर्डर

आजरा : आजरा तालुक्यातील १ हजार हेक्टर क्षेत्रावर भाताचे तरवा पेरणी व रोप लागण यांत्रिकी पद्धतीने केली जाणार आहे. आजरा तालुका शेतकरी विकास मंडळाने ७ गावांना ७ यांत्रिकी मशीनची ऑर्डर नागालँड व हरियाणा राज्यात दिली आहे. यामुळे भात रोप लागणीवेळी होणाऱ्या मजुरांच्या तुटवड्याला पर्याय उपलब्ध होणार आहे.आजरा तालुक्यात भात पिकाला मुबलक पाऊस व अनुकूल हवामान असल्यामुळे सर्वात जास्त भाताचे उत्पादन घेतले जाते. रोजगारासाठी गावागावातून तरुणांचे लोंढे शहराकडे जात असल्यामुळे शेती करण्याकडे तरुणांचा ओढा कमी झाला आहे. मजूर घेऊन शेती करणे सध्या परवडत नाही त्यामुळे तालुक्यातील २५ टक्के क्षेत्र ओसाड पडले आहे.शेतीसाठी मजुरांचा असणारा तुटवडा लक्षात घेऊन आजरा शेतकरी विकास मंडळाने भाताचे तरवा पेरणी मशीन चेन्नई येथून तर भात लागण मशीन नागालँड व हरियाणा येथून आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीचे पैसेही भरले आहेत. पहिल्या टप्प्यात दोन्ही प्रकारची ७ मशीन आणली जाणार आहेत. या मशीनचे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांना प्रशिक्षणही दिले जाणार आहे.शेतकऱ्यांना प्रशिक्षणतरवा पेरणी व भात रोप लागण मशीनची माहिती एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांना प्रशिक्षणातून दिली जाणार आहे. भात रोपे तयार करणे, यंत्र चालवणे व हाताळणे, तरवा तयार करणे व यंत्राने पेरणी करण्याची प्रात्यक्षिके व रोप लागण मशीन चालविण्याची प्रात्यक्षिके या प्रशिक्षणात दिली जाणार आहेत. प्रत्येक गावातील १० शेतकऱ्यांना प्रशिक्षणासाठी प्रवेश दिला जाणार आहे अशी माहिती आजरा तालुका शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष संभाजी सावंत यांनी दिली.९ हजार १०० हेक्टर क्षेत्रतालुक्यात धरणांमुळे पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे भाताचे क्षेत्र कमी होऊन उसाचे क्षेत्र वाढले आहे. तरीही ९ हजार १०० हेक्टर क्षेत्रावर भाताचे पीक घेतले जाते. ५५०० हेक्टर क्षेत्रावर भात रोप लागण केली जाते. पहिल्याच वर्षी १ हजार हेक्टर क्षेत्रावर यांत्रिकी पद्धतीने भात रोप लागण केली जाणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur's Ajra to Use Machines for Rice Planting; Training Provided

Web Summary : Ajra, Kolhapur will implement mechanized rice planting across 1,000 hectares. Farmers will receive training on using new machinery procured from Nagaland and Haryana to address labor shortages and boost rice production in the region. This initiative aims to revitalize agriculture.