शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

रोजंदारी कर्मचाऱ्यांचा ‘पीएफ’ रखडला

By admin | Updated: July 17, 2015 00:05 IST

आस्थापनाची दिरंगाई : ९७० कर्मचाऱ्यांना फटका--लोकमत हेल्पलाईन न्यूज

कोल्हापूर : महापालिकेकडे रोजंदारी व ठोक मानधनावर असलेल्या ९७० कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधीची दोन कोटी ७५ लाख रुपयांची रक्कम कर्मचारी भविष्य निधी कार्यालयाकडे जमा झालेली नाही. पगारातून दरमहा १२ टक्के कपात होणारी रक्कम नेमकी कुठे जाते, याची माहिती तरी प्रशासनाने द्यावी, अशी मागणी अनिल जाधव यांनी ‘लोकमत’कडे हेल्पलाईनद्वारे गुरुवारी केली. याबाबत महापालिका प्रशासनाकडे चौकशी केली असता, निधीकडे पैसा जमा करणे सुरू असून, येत्या दोन महिन्यांत सर्व पैसे जमा होतील, असे सांगण्यात आले.महापालिकेकडे रोजंदारी व ठोक मानधनावर ९७० कर्मचारी कामावर आहेत. महापालिकेच्या आस्थापना विभागाकडून या कर्मचाऱ्यांतून दरमहा कपात होणारी १२ टक्के भविष्य निर्वाह निधीची रक्कम व महापालिकेच्या वाट्याची १२ टक्के अशी २४ टक्के रक्कम संबंधित विभागाकडे जमाच केलेली नाही. कर्मचाऱ्यांनी तक्रार केल्यानंतर १६ फेब्रुवारीला सात दिवसांची नोटीसही बजावली. मात्र, मनपा प्रशासनाने हालचाल केलीच नाही.भविष्य निधी संघटनेच्या कारवाईच्या तगाद्याने आता प्रशासनाने भविष्य निर्वाहचे पैसे संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात केली आहे. आस्थापना विभागाकडे या कर्मचाऱ्यांची संपूर्ण माहिती अनेकवेळा सांगूनही दिली गेली नाही. जन्म दिनांक, कामावर रूजू दिनांक, आदी अत्यंत साधी कार्यालयीन माहितीही देण्यास आस्थापना विभागाने कुचराई केली. परिणामी गेली दोन वर्षे पैशांची मासिक पगारातून वजावट होऊनही ते भविष्य निर्वाह निधीकडे जमा झाले नाहीत. आता कर्मचाऱ्यांनी भविष्य निर्वाह निधीच्या खात्याचा तपशील मागण्यास सुरुवात केल्याने प्रशासन हडबडल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)आस्थापनातील त्रुटींमुळे कर्मचाऱ्यांचे भविष्य निधीचे पैसे जमा होऊन संबंधित खात्याकडे वर्ग करता आले नाहीत. गेल्या महिन्याभरात एक कोटी ५९ लाख व एक कोटी २५ लाख रुपये असे दोन टप्प्यांत हे पैसे निधीकडे जमा केले आहेत. आता फक्त मागील तीन महिन्यांचे ४५ लाख रुपये जमा करणे बाकी आहेत.- संजय सरनाईक, मुख्य लेखाधिकारी, महापालिकाआमच्या पगारातून कपात होणारे पैसे नेमके कुठे जातात याची माहिती तोंडी व लेखी मागूनही दिली जात नाही. त्यामुळे भविष्य निर्वाह निधीकडेही याबाबत दाद मागितली. कर्मचाऱ्यांच्या पैशांचा हिशेब किंवा खात्यांचा तपशील वेळोवेळी मिळाला पाहिजे.- अनिल जाधव, पवडी रोजंदारी कर्मचारी, महापालिका