शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
3
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
4
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
5
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
6
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
7
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
8
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
9
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
10
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
11
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
12
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
13
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
14
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
15
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
16
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
17
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
18
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
19
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

१९ गटांच्या लिलावात अकरा कोटींचा महसूल

By admin | Updated: January 21, 2015 00:10 IST

वाळूची ई-निविदा : सर्वाधिक बोली घालवाड वाळूगटास

कोल्हापूर : जिल्ह्यातील विविध नदीपात्रांतील वाळू उपसा करण्याचा लिलाव आज ई-निविदा पद्धतीने पार पडला. त्यांतील ६५ पैकी १९ वाळूगटांच्या लिलावातून राज्य सरकारला १० कोटी ६९ लाख ९० हजार ६८६ रुपयांचा महसूल मिळाला. सर्वाधिक १ कोटी ९० लाखांची बोली शिरोळ तालुक्यातील घालवाड येथील वाळूगटास मिळाली. विशेष म्हणजे गेल्यावर्षी झालेल्या बोलीतून ५१ गटांना १० कोटी ९७ लाख मिळाले होते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा चांगला महसूल मिळाला आहे. जिल्ह्यातील ५४ गटांचा तसेच आज, मंगळवारच्या लिलावात बोली न लागलेल्या ४६ गटांच्या लिलावाकरिता गुरुवारी (दि. २२) जाहीर नोटीस देऊन फेब्रुवारी महिन्यात बोली घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील विविध नदीपात्रांतील ६५ वाळू / रेती गटांच्या लिलावाची निविदा व बोली प्रक्रिया ही आॅनलाईन पद्धतीने पार पडली. यामध्ये शिरोळ तालुक्यातून ४५, हातकणंगले तालुक्यातील चार, तर गडहिंग्लज तालुक्यातील १६ वाळूगटांचा समावेश होता. आज, मंगळवारी सकाळी ११ ते दुपारी एक या वेळेत बोलीची प्रक्रिया आॅनलाईन सुरू होती. या वेळेत ७१ लिलावधारकांनी भाग घेतला. या लिलावातून ६५ पैकी १९ वाळूगटांना आॅनलाईन बोली प्राप्त झाली. त्यामध्ये शिरोळ तालुक्यातील १५, गडहिंग्लज तालुक्यातील २, तर हातकणंगले तालुक्यातील २ वाळूगटांचा समावेश आहे. बोलीला चांगला प्रतिसाद मिळाला. एकूण १० कोटी ६९ कोटी ९० हजार ६८६ रुपये इतका महसूल मिळाला. याबाबत माहिती देताना जिल्हा खनिकर्म अधिकारी अभय भोगे यांनी सांगितले की, कोणताही वादविवाद न होता अत्यंत पारदर्शक पद्धतीने ही बोली प्रक्रिया पार पडली. गेल्यावर्षी ५१ गटांतून १० कोटी ९७ लाखांचा महसूल मिळाला होता. यंदा केवळ १९ गटांतून १० कोटी ६९ लाखांचा महसूल मिळाला आहे. अद्याप १०० गटांची बोली लागलेली नाही. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी मोठा प्रतिसाद मिळाला आहे.