शहरं
Join us  
Trending Stories
1
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
2
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
3
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
4
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
5
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
6
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
7
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
8
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
9
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
10
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप
11
'आमच्याकडे ब्रह्मोस आहे', शाहबाज शरीफ यांच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी संतापले
12
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
13
लेक हुशार, डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं, पण वडिलांना नव्हतं मान्य! दूधातून गुंगीचं औषध दिलं अन्...
14
चीन-अमेरिका सैन्यात समुद्रात चकमक, ट्रम्पच्या धोकादायक जहाजाला क्षेत्राबाहेर हाकलून लावलं...
15
जुलैमध्ये 'या' कारचं नशीब अचाकनच 'चमकलं'; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; 4 महिन्यांचा विक्रम मोडला!
16
जत्रेतील आकाश पाळण्याला लटकली महिला, पाहणाऱ्यांच्या तोंडचं पळालं पाणी, अखेर...  
17
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
18
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
19
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
20
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?

Kolhapur: डिजिटल अरेस्टची भीती दाखवून ८ कोटींची फसवणूक, विश्वास नांगरे-पाटील यांच्या नावाचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 11:15 IST

सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, रिझर्व्ह बँक, सेबीचे बोगस पत्रे पाठविली

कोल्हापूर : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) या दहशतवादी संघटनेशी संबंध आहेत. त्यांना आपण आर्थिक साहाय्य करत असल्याने देशद्रोहाच्या गुन्ह्यात कोणत्याही क्षणी कारवाईची धमकी देत, डिजिटल अरेस्ट करण्याचे सांगत अनोळखी सायबर भामट्यांनी शेअर्स विक्री करण्यास भाग पाडून रिलायन्स इंडस्ट्रीजमधून सहायक उपाध्यक्ष म्हणून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यास ७ कोटी, ८६ लाख २१ हजार ६९६ रुपयांचा गंडा घालून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. दत्तात्रय गोविंद पाडेकर (वय ७५ रा. प्लाॅट नंबर ९८, तात्यासाहेब मोहिते कॉलनी, देवकर पाणंद रोड, कोल्हापूर) यांनी शुक्रवारी जुना राजवाडा पोलिसांत फिर्याद दिली.शेअर्स विक्री करण्यास भाग पाडून जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत ईडी कार्यालयाच्या खात्यावर पैसे जमा राहतील, असे सांगत भामट्यांनी पाडेकर यांना व्हॉट्सॲपवर सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, रिझर्व्ह बँक आणि सेबीचे पत्रे पाठविली. पाडेकर यांनी आपल्या दोन खात्यांवरून ही रक्कम वेगवेगळ्या १४ जणांच्या खात्यावर वर्ग केल्याचे उघडकीस आले.

जुना राजवाडा पोलिस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाडेकर गुजरात जामनगर येथील रिलायन्स इंडस्ट्रीजमधून सहायक उपाध्यक्ष या पदावरून १६ वर्षे नोकरी करून निवृत्त झाले. २४ मे, २०२५ ला सकाळी साडेदहा वाजता अनोळखी नंबरवरून त्यांना फोन आला. विजयकुमार असे नाव सांगून त्याने डाटा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडियामधून बोलत असल्याचे सांगितले.तुमचा डाटा लिक झाला असून, आधारकार्डचे शेवटचे चार अंक कन्फर्म करावे, असे सांगितले. ते चार अंक सांगितल्यानंतर तुमचे आधारकार्ड वापरून २६ एप्रिल, २०२५ ला तुमच्या नावाने अंधेरी पूर्व येथून एक मोबाइल विकत घेतला आहे. त्या मोबाइलचा वापर अनधिकृत जाहिराती, फसवणूक आणि इतर लोकांना त्रास देण्यासाठी केला जात आहे. याप्रकरणी आर. पी. अलाॅयसियस आणि अन्य २० तक्रारदारांनी तुमच्या विरोधात तक्रारी दाखल केल्या असल्याचे सांगितले.

याप्रकरणी तुमच्या विरोधात दाखल केलेल्या गुन्ह्याची माहिती व्हॉट्सॲपवर पाठविणार असल्याचे सांगितले. पाडेकर यांचे व्हॉट्सॲप बंद असल्याने विजयकुमार याने पाडेकर यांची पत्नी सुरेखा यांच्या मोबाइलवर नोटीस पाठविली. त्यात मुंबई पोलिसांचा लोगो, इंग्रजीत पाडेकर यांचा मोबाइल क्रमांक होता. त्यानंतर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या काही लोकांचे फोटो पाठविले. पाडेकर यांच्या नावाने असलेले कॅनरा बँकेचे बोगस एटीएमचा फोटोही पाठविला. बँक खाते मुंबई शाखेचे असून, त्याचा तपशील पाठवून पीएफआयला फंडिंग झाला असल्याची भीती घातली. पाडेकर यांनी याप्रकरणी माझा काहीही संबंध नसल्याचे सांगितले, मात्र विजयकुमार याने पुढील तपासकामी तुमचे प्रकरण कुलाबा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पिसे यांच्याकडे सोपविली असल्याचे सांगितले.पिसे यांच्या ओळखपत्राची कॉपीही मोबाइलवर पाठवून याप्रकरणी कुलाबा पोलिस ठाण्यात यावे लागेल, असे सांगितले. ज्येष्ठ नागरिक असून, मुंबईला येणे शक्य नसल्याचे पाडेकर यांनी सांगताच व्हाॅट्सॲप कॉलवर चौकशी केली जाईल, असे सांगून त्रयस्त यंंत्रणेकडे प्रकरण वर्ग केले आहे. हे प्रकरण राष्ट्रीय सुरक्षासंदर्भात असून, देशाच्या संदर्भातील माहिती कोठेही प्रसारित करू नका, तुम्ही त्यांना सहकार्य करा, अशी भीती घातली.

विश्वास नांगरे-पाटील यांच्या नावाचा वापर

ईडी कार्यालयातून बोलत असल्याचे संदीप राव याने कुटुंबाची माहिती सांगितली. पाडेकर यांनी माझा मनी लाँड्रीगशी काहीही संबध नाही, कोणालाही पैसे ट्रान्सफर केलेले नाहीत, ही सायबर फसवणूक असून, पोलिस ठाण्यास तक्रार देण्यासाठी जात आहे, असे सांगताच राव याने फोन बंद केला. काही वेळाने पुन्हा फोन करून अतिरिक्त पोलिस महासंचालक विश्वास नांगरे-पाटील बोलत असल्याचे सांगितले. संदीप राव आमचे वरिष्ठ अधिकारी असून, तुम्ही त्यांना सहकार्य का करत नाही, असे सांगितले. त्यानंतर पाडेकर यांना सुप्रीम कोर्टाची नोटीसही व्हॉट्सॲपवर पाठविली. रिझर्व्ह बँक आणि सेबीच्या पत्राचाही मेसेज पाठविला. नावावर असलेले शेअर्स विक्री करण्यास भाग पाडले.

शेअर्सची रक्कम ७ कोटी ५० लाखपाडेकर यांनी शेअर्स विक्री करून ७ कोटी ५० लाख रुपयांची रक्कम मंगळवार पेठेतील त्यांच्या बँकेच्या खात्यावर जमा केली. पत्नीच्या नावावर ३० लाख जमा होते. दोघांचेही संयुक्त खाते असल्याने ही सर्व रक्कम आमच्याकडे जमा करा. चौकशी पूर्ण झाल्यानंतर ही रक्कम पुन्हा परत करण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार पाडेकर यांना १४ जणांच्या वेगवेगळ्या खात्यांवर ही रक्कम ऑनलाइन ट्रान्सफर करण्यास भाग पाडले.

रक्कम परत आली नसल्याने गुन्हा दाखलपाडेकर यांनी कोट्यवधीची रक्कम बँकेत वर्ग केली. चौकशी सुरू असल्याने ही रक्कम आपल्याला परत देता येणार नाही, मात्र चौकशी पूर्ण झाल्यानंतर दि. २४ जून २०२५ पर्यंत आपल्या खात्यावर ही रक्कम जमा होईल, अशा भूलथापा सायबर गुन्हेगारांनी मारल्या. २४ जूनला बँकेच्या खात्यावर ही रक्कम जमा झाली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर घाबरलेल्या पाडकेर यांनी जुना राजवाडा पोलिसांत धाव घेऊन गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून अपर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे यांच्याशी संपर्क साधून तपास सुरू केला.

तीनही मुले परदेशातपाडेकर यांची तीनही मुले कामानिमित्त परदेशात आहेत. त्यांना घडलेला हा प्रकार मुलांना सांगितला. त्यांनी घडलेल्या प्रकरणी पोलिसांत फिर्याद दाखल करण्यास सांगितले. सुमारे तीन तास याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्याकडून माहिती घेतली.