Gram Panchayat Election Result: आजरा तालुक्यात गुलाल उधळला, जाणून घ्या निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2023 12:00 IST2023-11-06T11:58:55+5:302023-11-06T12:00:22+5:30

आजरा : आजरा तालुक्यातील १० ग्रामपंचायतीपैकी ३ ठिकाणी सत्तांतर, ६ ठिकाणी सत्तारुढ तर १ ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. पेरणोली, ...

Results of 10 Gram Panchayats of Ajara Taluka announced | Gram Panchayat Election Result: आजरा तालुक्यात गुलाल उधळला, जाणून घ्या निकाल

Gram Panchayat Election Result: आजरा तालुक्यात गुलाल उधळला, जाणून घ्या निकाल

आजरा : आजरा तालुक्यातील १० ग्रामपंचायतीपैकी ३ ठिकाणी सत्तांतर, ६ ठिकाणी सत्तारुढ तर १ ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. पेरणोली, बुरुडे, मेंढोली येथे सत्तांतर तर सुलगाव, मसोली, विटे, वेळवट्टी, हरपवडे, देऊळवाडी येथे सत्तारूढ गट तर चांदेवाडी ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. पेरणोलीत सर्वच नेत्यांना धक्का देत युवा आघाडीने सत्तांतर घडविले.

ग्रामपंचायतनिहाय निवडून आलेले सरपंच असे पेरणोली - प्रियांका जाधव, मेंढोली - विलास जोशीलकर, हरपवडे - सागर पाटील,  सुलगाव - पांडुरंग खवरे, विटे - ज्योती चव्हाण,  बुरुडे - वैशाली गुरव, मसोली - चंद्रकांत गुरव,  वेळवट्टी -  मारुती पोवार - बिनविरोध,  देऊळवाडी यशोदा पोवार - बिनविरोध, चांदेवाडी - स्वाती कोंडूसकर- बिनविरोध.

Web Title: Results of 10 Gram Panchayats of Ajara Taluka announced