शहरं
Join us  
Trending Stories
1
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
2
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
3
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
4
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
5
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
6
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
7
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
8
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
9
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
10
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
11
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
12
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
13
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
14
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
15
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
16
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
17
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
18
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
19
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
20
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात १९ ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:25 IST

कोल्हापूर : कोरोना संसर्गामुळे शहरात रुग्णांची संख्या वाढू लागली असल्याने आतापर्यंत शहरातील चारही विभागीय कार्यालयाअंतर्गत १९ ठिकाणी प्रतिबंधित ...

कोल्हापूर : कोरोना संसर्गामुळे शहरात रुग्णांची संख्या वाढू लागली असल्याने आतापर्यंत शहरातील चारही विभागीय कार्यालयाअंतर्गत १९ ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र (कंटेनमेंट झोन) करण्यात आले आहेत. याठिकाणी महापालिकेच्यावतीने बॅरिकेटस‌ लावून ही इमारत अथवा गल्ली सील करण्यात आली आहे.

राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे, तसा कोल्हापूर शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे महापालिकेच्यावतीने विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. शहरामध्ये आजअखेर १९ कंटेनमेंट झोन तयार केले आहेत. यामध्ये गांधी मैदान विभागीय कार्यालयअंतर्गत ५ ठिकाणी कंटेनमेंट झोन तयार केले आहेत. छत्रपती शिवाजी मार्केट विभागीय कार्यालयअंतर्गत ६, राजारामपुरी विभागीय कार्यालयअंतर्गत १, तर छत्रपती ताराराणी मार्केट विभागीय कार्यालयअंतर्गत ७ ठिकाणी कंटेनमेंट झोन तयार केले आहे.

या सर्व ठिकाणी महापालिकेच्यावतीने बॅरिकेटस‌ लावून प्रतिबंधित क्षेत्र म्हणून फलक लावण्यात आले आहेत. या कंटेनमेंट झोनमधील नागरिकांनी बाहेर फिरू नये, महापालिकेने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.